४०० रुपयांचा एलईडी बल्ब सरकार देणार १० रुपयांत!

By admin | Published: October 9, 2014 03:09 AM2014-10-09T03:09:37+5:302014-10-09T03:09:37+5:30

बाजारात ४०० रुपयांना मिळणारा, विजेची मोठी बटत करणारा, एलईडी बल्ब अवघ्या १० रुपयांत सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करण्याचे एक अभिनव ‘

Government will pay Rs 400 for LED bulb in 10 rupees! | ४०० रुपयांचा एलईडी बल्ब सरकार देणार १० रुपयांत!

४०० रुपयांचा एलईडी बल्ब सरकार देणार १० रुपयांत!

Next

नवी दिल्ली : बाजारात ४०० रुपयांना मिळणारा, विजेची मोठी बटत करणारा, एलईडी बल्ब अवघ्या १० रुपयांत सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करण्याचे एक अभिनव ‘बिझिनेस मॉडेल’ केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने तरार केले आहे. एलईडी प्रकाशस्रोताचा शोध लावणाऱ्या तीन जपानी वैज्ञानिकांना यंदाचा पदार्थविज्ञानातील नोबेल पुरस्कार जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी या नव्या उपक्रमाची प्रत्यक्षात सुरुवातही करण्यात आली आहे.
एका अधिकृत पत्रकात ही माहिती देताना असे म्हटले आहे की, ‘ब्युरो आॅफ एनर्जी एफिशियन्सी’ आणि सार्वजनिक क्षेत्रातील चार केंद्रीय वीज कंपन्यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लि.’ (ईईएसएल)ने वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या सहकार्याने हे नवे ‘बिझिनेस मॉडेल’ विकसित केले आहे. त्यानुसार १ईईएसएल’ खासगी उत्पादकांकडून एलईडी दिव्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करून त्यांची नागरिकांना प्रति बल्ब १० रुपये या दराने विक्री करणार आहे.
एलईडी दिव्यांच्या वापरातून विजेची बचत होऊन जो खर्च वाचेल त्यातून वीज वितरण कंपन्यांनी त्यापुढील पाच ते आठ वर्षांत ‘ईईएसेल’ला त्यांनी पुरविलेल्या एलईडी दिव्यांची रक्कम अदा करायची, असेही या ‘बिझिनेस मॉडेल’मध्ये अंतर्भूत असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या ‘मॉडेल’नुसार एलईडी दिवे पुरविण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदांमध्ये देशातील विद्युत दिवे बनविणाऱ्या बहुतेक सर्वच कंपन्या सहभागी झाल्या व त्यांनी विविदेत दिलेली एलईडी दिव्याची कमीत कमी किंमत २०४ रुपये होती, असेही हे पत्रक म्हणते. भारतीय बाजारात २०१० मध्ये एलईडी दिवे सर्वप्रथम आले तेव्हा त्यांची किंमत प्रत्येकी १,२०० रुपये होती.
राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या घरांमध्ये वीज पुरवठा करताना फक्त एलईडी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे केंद्रीय ऊर्जा विभागाने याआधीच ठरविले आहे. रस्त्यांवरील सध्याचे पारंपारिक दिवे काढून त्याऐवजी एलईजी दिवे बसविण्याची अनेक कामे ‘ईईएसएल’ने देशाच्या अनेक भागांत पूर्ण केली आहेत. अशाच प्रकारे पुद्दुचेरीमधील ७.५ लाख घरांमध्येही एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत.
विजेच्या दिव्यांचे उत्पादन करणाऱ्या देशातील सर्व कंपन्यांनी एलईडी दिव्यांचे कारखाने स्थापन केले असून अभियंत्यांना प्रशिक्षण देणे व विविध इमारतींमध्ये जाऊन या दिव्यांची प्रात्यक्षिके दाखविणेही सुरु केले आहे. एलईडी दिव्यांची घरगुती वापरासाठीची मागणी वाढेल तसतशी त्यांचे उत्पादन वाढेल आणि किंमतही कमी होईल, असेही ‘ईईएसएल’ने म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Government will pay Rs 400 for LED bulb in 10 rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.