सरकार स्वस्त डाळ-तांदूळ विकणार; ‘भारत डाळ’ ६० रुपये किलोची
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 01:38 PM2023-07-20T13:38:14+5:302023-07-20T13:40:19+5:30
मिळणार स्वस्त चणाडाळ
नवी दिल्ली- डाळ आणि तांदळाच्या किमती खाली आणण्यासाठी केंद्र सरकारने स्वस्तात डाळ-तांदूळ विकण्याची तयारी केली आहे. त्यानुसार, ६० रुपये किलो दराची ‘भारत डाळ’ जारी करण्यात आली आहे. डाळ-तांदळाच्या किमती कमी करण्यासाठी सरकारने ‘ओपन मार्केट सेल स्कीम‘ (ओएमएसएस) नावाची योजना आधीच सुरू केली आहे. त्याअंतर्गत ई-लिलावाद्वारे डाळ व तांदूळ विकण्याचा प्रयत्न सरकारने केला. ई-लिलावात तांदळाची किंमत ३१ रुपये किलो ठेवण्यात आली आहे. बाजारात उपलब्ध समान जातीच्या तांदळाच्या किमतीच्या तुलनेत ही किंमत अधिक आहे. त्यामुळे खरेदीसाठी कोणीही पुढे यायला तयार नाही.
जागतिक बाजारात तांदूळ
१० टक्के महागला
देश किंमतवाढ
भारत ४०,७७५ ९.८%
थायलंड ४३,८२० ५.०%
पाकिस्तान ४२,८३० ७.५%
व्हिएतनाम ४२,४२० ५.६%
मिळणार स्वस्त चणाडाळ
अन्न मंत्रालयाने ‘भारत डाळ’ नावाने ६० रुपये किलो दराने चणा डाळ विकण्याचा निर्णय घेतला आहे. नाफेडच्या ७०३ स्टोअर्समध्ये ही डाळ उपलब्ध असेल.
लेटर ऑफ क्रेडिट...
तांदळाच्या निर्यातीवर अंकुश लावला जाण्याची शक्यता वाढल्यामुळे लेटर ऑफ क्रेडिटची मागणी वाढली आहे. त्याआधारे नंतर तांदूळ निर्यात केला जाऊ शकतो.
दर आठवड्यास ई-लिलाव
किमती खाली आणण्यासाठी एफसीआय दर आठवड्यास चना
व तांदूळ यांचा ई-लिलाव
करीत आहे.
१ वर्षातील दर (१८ तारखेचे दर; प्रतिकिलो भाव रुपयात)
जुलै २०२२ ते जुलै २०२३
तांदूळ ३५.२ ३६.५ ३७.६ ३८.८ ३९.२ ३९.९ ४०.७
तूरडाळ १०३ ११० १०८ ११४ ११८ १३० १४५