अपघातातील जखमींवर सरकार करणार २.५ लाखांपर्यंत खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 04:27 AM2020-08-31T04:27:27+5:302020-08-31T04:28:26+5:30
यात अशा लोकांचा समावेश करण्यात येईल जे हीट अॅण्ड रनचे शिकार झाले आहेत किंवा अशा वाहनाच्या तडाख्यात सापडले आहेत ज्यांचा थर्ड पार्टी विमा नाही.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या लोकांवर मोफत उपचार करण्याची योजना सरकार तयार करीत आहे. याअंतर्गत दुर्घटनेत जखमी होणाºया व्यक्तीवर अडीच लाख रुपयांपर्यंतचा खर्च सरकार करणार आहे. ही योजना टो यात अशा लोकांचा समावेश करण्यात येईल जे हीट अॅण्ड रनचे शिकार झाले आहेत किंवा अशा वाहनाच्या तडाख्यात सापडले आहेत ज्यांचा थर्ड पार्टी विमा नाही.ल टॅक्सला लिंक करण्याची तयारी सुरू आहे.
या योजनेनुसार, रस्ते अपघातात जखमी होणाºया लोकांवर कॅशलेस उपचार केले जातील.यासाठी अडीच लाख रुपयांपर्यंतची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
पाच वर्षांत तीनपट होणार टोल मार्ग
25,000 कि.मी. मार्गावर टोल वसूल केला जातो. देशात १.४० लाख कि.मी. लांब महामार्ग आहेत.
मंत्रालयाची अशी योजना आहे की, आगामी पाच वर्षांत नव्या टोल मार्गाची निर्मिती ७५ हजार कि.मी.पर्यंत करावी. यामुळे टोल महसुलात वाढ होईल.
2019-20 मध्येसरकारला मागील आर्थिक वर्षात टोल टॅक्समधून 30,000 कोटी रुपयांची कमाई झाली होती. देशात एकूण ५६३ टोल प्लाझावर टोल वसूल करण्यात येतो. उत्तर प्रदेश ६६, महाराष्ट्र ५१, बिहार १९, आंध्रमध्ये ४२, कर्नाटक ४१, मध्यप्रदेश ४८ आणि गुजरातमध्ये ४० टोल प्लाझा आहेत.
सप्टेंबरपासून वाढणार टोलचे दर
टोल प्लाझातून जाणाºया वाहनांना आगामी महिन्यापासून अधिक टोल द्यावा लागणार आहे. परिवहन मंत्रालयाने टोल टॅक्सच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी आणि व्यावसायिक वाहनांना वेगवेगळे दर आकारले जातील. नवे दर १ सप्टेंबरपासून लागू होतील.
यामुळे प्रत्येक वाहनाला ५ ते १० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.