घरगुती सौरउर्जा निर्मितीसाठी सरकार खर्च करणार ५ हजार कोटी

By admin | Published: December 30, 2015 06:07 PM2015-12-30T18:07:56+5:302015-12-30T18:22:13+5:30

घरगुती सौरऊर्जा निर्मीतीसाठी भारत सरकार २०२१ सालापर्यंत ५ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

The government will spend Rs 5000 crore to generate solar energy | घरगुती सौरउर्जा निर्मितीसाठी सरकार खर्च करणार ५ हजार कोटी

घरगुती सौरउर्जा निर्मितीसाठी सरकार खर्च करणार ५ हजार कोटी

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - घरगुती सौरऊर्जा निर्मीतीसाठी भारत सरकार २०२१ सालापर्यंत ५ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. पुढील ५ वर्षात यामधून ४,२०० मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात येणार असल्याचे आज भारत सरकार तर्फे सांगण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने कुटुंबे, सरकारी संस्था, रुग्णालय आणि शैक्षणिक संस्था यांना सौरऊर्जा वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पूर्वीच्या 6 अब्ज रुपयांच्या निधीत वाढ केली. खासगी, औद्योगिक कंपन्याना सौरऊर्जेसाठी अनुदान मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. 
सौरऊर्जेच्या माध्यमातून २०२२ पर्यंत १००,००० मेगावॅट विजनिर्मिती करण्याचे सरकारचे ध्येय असल्याचे सांगण्यात आले.
भारत हा देश सौर ऊर्जेचा देश म्हणून ओळखला जातो. सुमारे ३२५ दिवस उत्तम सूर्यप्रकाश आणि उष्णता मोफत मिळत असल्याने सौर ऊर्जेच्या वापराकडे सरकारने लक्ष केंद्रित केले आहे.
वापरण्यास अत्यंत सोपी, कोणतेही प्रदूषण न करणारी, भरवशाची, मुबलक प्रमाणात वापरता येणारी, मोफत मिळणारी, सौर ऊर्जा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शाश्वत असा नैसर्गिक अपारंपरिक स्रोत  आहे.

Web Title: The government will spend Rs 5000 crore to generate solar energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.