माझ्यामुळे ईपीएफवरील कर लावण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला - राहुल गांधी
By admin | Published: March 8, 2016 04:07 PM2016-03-08T16:07:59+5:302016-03-08T16:07:59+5:30
मी केलेल्या प्रयत्नांमुळेच सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील (ईपीएफ) कर लावण्याचा प्रस्ताव मागे घेतल्यांचं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी सांगितलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ८ - मी केलेल्या प्रयत्नांमुळेच सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील (ईपीएफ) कर लावण्याचा प्रस्ताव मागे घेतल्यांचं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी सांगितलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत सरकार हा प्रस्ताव मागे घेत असल्यांची माहिती दिली आहे.
सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे मध्यमवर्गीय कुटुंब दुखावली गेली होती. त्यामुळे मी सरकारवर दबाव आणण्याचा निर्णय घेतला आणि मी घातलेल्या दबावाचा परिणाम झाला असं राहुल गांधी बोलले आहेत. राहुल गांधी यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (ईपीएफ) रक्कम काढल्यावर कर लावण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केलं होतं.
Finally the Govt was forced to listen to people and roll back the patently unfair tax on EPF (1/2)
— Office of RG (@OfficeOfRG) March 8, 2016
But the attempt to tax the safety net of millions of hard working middle class ppl was morally wrong&shows this Govt's anti-ppl mindset(2/2)
— Office of RG (@OfficeOfRG) March 8, 2016