गरिबांचे सबलीकरण ही सरकारची उपलब्धी

By admin | Published: May 27, 2016 04:04 AM2016-05-27T04:04:16+5:302016-05-27T04:04:16+5:30

केंद्रात मोदी सरकारच्या कारकिर्दीची दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि सरकारच्या वतीने आपल्या विविध उपलब्धींची चर्चा करताना गरिबांचे सबलीकरण

Government's achievement is the empowerment of the poor | गरिबांचे सबलीकरण ही सरकारची उपलब्धी

गरिबांचे सबलीकरण ही सरकारची उपलब्धी

Next

नवी दिल्ली : केंद्रात मोदी सरकारच्या कारकिर्दीची दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि सरकारच्या वतीने आपल्या विविध उपलब्धींची चर्चा करताना गरिबांचे सबलीकरण, गरिबी निर्मूलनासाठी बँक खात्यात थेट हस्तांतरण, पंतप्रधान जनधन योजना, कौशल्य विकास, उज्ज्वला योजना, दीनदयाल उपाध्याय अंत्योदय आणि ग्राम ज्योती योजना, जन सुरक्षा, पंतप्रधान घरकुल योजना, ग्राम सडक आणि स्वच्छ भारत अभियानासारख्या योजनांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. भाजपातर्फे गुरुवारी ‘गरिबांचे सबलीकरण’ असा मथळा असलेले पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हवाल्याने आमचे सरकार गरिबांसाठी असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवायही अनेक दावे यात करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यानंतर प्रथमच गरिबांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि वेगाने शून्य रकमेची खाती उघडण्यात आली. याअंतर्गत २१.८१ कोटी खाती उघडण्यात आली असून त्यात ३७,६१६ कोटी रुपये जमा झाले आहेत. दलाल आणि इतर मध्यस्थांना बाजूला सारून योग्य लाभार्र्थींपर्यंत लवकरात लवकर लाभ पोहोचविण्याच्या दृष्टीने अशा अनेक उपाययोजना अमलात आल्या आहेत, याकडे पक्षाने लक्ष वेधले आहे. पुस्तकातील दावे दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत स्वातंत्र्यापासून अंधारात असलेल्या गावखेड्यांपर्यंत वीज पोहोचवून तेथील लोकांचे जीवन बदलण्याची योजना आहे. याअंतर्गत 1000 दिवसात १८,५०० गावांमध्ये वीज पोहोचविण्याचे लक्ष्य असून २०१५-१६ मध्ये ७,१०८ गावांमध्ये वीज पोहोचली आहे. कौशल्य विकासाच्या पुढाकाराने तरुणांना भविष्याची नवी दिशा मिळाली आहे. गावखेड्यांमधील गरिबी दूर करण्यासाठी प्रशिक्षणानंतर थेट रोजगाराचा प्रयत्न. दीनदयाल ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत ३ लाख ५६ हजार युवकांना प्रशिक्षित करण्यात आले. उज्ज्वला योजनेअंतर्गत एलपीजी कनेक्शन देऊन धुरापासून मुक्तता. गरिबांसाठी नवीन आरोग्य विमा तर ज्येष्ठांना अतिरिक्त विमा पॅकेजचे कवच. पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत शहरी गरिबांसाठी २०२२ पर्यंत दोन कोटी घरे बांधण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. तर ग्रामीण गरिबांसाठी २०१९ पर्यंत १.२० लाख रुपये खर्चाची एक कोटी घरे बांधणार आणि या सर्व घरांमध्ये शौचालये असतील. पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेअंतर्गत प्रत्येक गाव रस्त्याला जोडले जाईल. अंत्योदय योजनेअंतर्गत ८.९ कोटी गरिबांच्या घरांपर्यंत पोहोचणार स्वच्छ भारत अभियान ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना खरी श्रद्धांजली असून याअंतर्गत भारताला स्वच्छ करण्यास पुढाकार घेण्यात आला आहे. कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी तरुणांना प्रत्येकी २५,६९६ रुपयांपासून १,२२,३६२ रुपयांपर्यंत आर्थिक मदत.

Web Title: Government's achievement is the empowerment of the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.