मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क मिळवून देणं सरकारचं कर्तव्य- मोदी
By admin | Published: October 24, 2016 03:17 PM2016-10-24T15:17:00+5:302016-10-24T15:17:00+5:30
मुस्लिम समाजातील तीन वेळा तोंडी तलाक देण्याच्या प्रथेबाबत राजकारण करू नये. भारतातील मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे आणि त्यांना हक्क मिळवून देणं हे सरकारचं कर्तव्य
Next
>ऑनलाइन लोकमत
बुंदेलखंड, दि. 24 - मुस्लिम समाजातील तीन वेळा तोंडी तलाक देण्याच्या प्रथेबाबत राजकारण करू नये. भारतातील मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे आणि त्यांना हक्क मिळवून देणं हे सरकारचं कर्तव्य आहे, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.
देशभरात सध्या मुस्लिम समाजातील तीन वेळा तोंडी तलाक देण्याच्या प्रथेवर बंदी घालण्याचा विषय चर्चेत आहे. तसेच या प्रथेवर सर्वोच्च न्यायालयात खटलादेखील सुरू आहे. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे विधान महत्वाचं मानलं जात आहे.
बुंदेलखंडच्या महोबा जिल्ह्यात एका रॅलीमध्ये त्यांनी तोंडी तलाक देण्याच्या पद्धतीवर त्यांनी भाष्य केलं. तोंडी तलाकप्रथेबाबत काही राजकिय पक्ष राजकारण करत आहेत, त्यामुळे मुस्लिम महिला त्यांच्या मुलभूत हक्कापासून वंचित आहेत. तोंडी तलाक देण्याचा मुद्दा हा हिंदू-मुस्लिम मुद्दा नसून विकासाचा मुद्दा आहे त्यामुळे या मुद्द्यावरून राजकारण न करण्याचं आवाहनही मोदींनी केलं. तसेच केवळ फोनवर तीन वेळेस तलाक बोलल्यास तलाक कसा काय होऊ शकतो असा सवालही त्यांनी केला.