झाकीर नाईकच्या हालचालींवर सरकारचे बारीक लक्ष, लवकरच बंदी येऊ शकते

By admin | Published: July 10, 2016 02:05 PM2016-07-10T14:05:46+5:302016-07-10T14:05:46+5:30

दहशतवादा संदर्भातल्या झाकीर नाईकच्या वक्तव्यांवर केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.

The government's fine focus on Zakir Naik's movements can be banned soon | झाकीर नाईकच्या हालचालींवर सरकारचे बारीक लक्ष, लवकरच बंदी येऊ शकते

झाकीर नाईकच्या हालचालींवर सरकारचे बारीक लक्ष, लवकरच बंदी येऊ शकते

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १० - दहशतवादा संदर्भातल्या झाकीर नाईकच्या वक्तव्यांवर केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेची नऊ पथके त्याशिवाय गुप्तचर यंत्रणा आणि अन्य तपास यंत्रणा झाकीर नाईकच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत. विशेष पथके त्याच्या भाषणाच्या चित्रफितींमधील शब्द न शब्द  तपासत आहेत.
 
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार चार पथके फुटेज आणि भाषणांच्या सीडी तपासण्यासाठी स्थापन करण्यात आली आहेत. तीन टीम्स सोशल साईटसवर लक्ष ठेऊन आहेत आणि दोन टीम्स नाईकच्या फेसबुक पोस्टवर लक्ष ठेऊन आहेत. प्राथमिक तपासात नाईकची भाषणे चिथावणीखोर आणि आक्षेपार्ह असल्याचे समोर आले आहे. 
 
त्याशिवाय त्याच्या संस्थेबद्दलही संशय निर्माण झाला आहे. झाकीर नाईकला समाजसेवेसाठी जो निधी मिळाला त्याचाही गैरवापर झाल्याचे समोर आले आहे. फोन कॉल्स आणि ई-मेल शिवाय झाकीर नाईकच्या परदेश दौ-याचे प्रायोजकही एनआयएच्या रडावर आहेत. केंद्र सरकार यासंबंधी कायदेशीर मत घेईल. सूत्रांच्या माहितीनुसार नाईकवर लवकरच बंदी येऊ शकते. 
 

Web Title: The government's fine focus on Zakir Naik's movements can be banned soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.