असहिष्णुतेवरून सरकारची अग्निपरीक्षा

By admin | Published: November 25, 2015 12:14 AM2015-11-25T00:14:05+5:302015-11-25T00:14:05+5:30

असहिष्णुतेपासून तर वाढत्या महगाईपर्यंतच्या अनेक मुद्यांवरून सरकारला घेरण्यासाठी समस्त विरोधी पक्ष एकजूट झाल्यामुळे येत्या २६ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत

The government's fire test on intolerance | असहिष्णुतेवरून सरकारची अग्निपरीक्षा

असहिष्णुतेवरून सरकारची अग्निपरीक्षा

Next

नवी दिल्ली : असहिष्णुतेपासून तर वाढत्या महगाईपर्यंतच्या अनेक मुद्यांवरून सरकारला घेरण्यासाठी समस्त विरोधी पक्ष एकजूट झाल्यामुळे येत्या २६ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत असलेले संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सरकारला विविध मुद्यांवरून लक्ष्य बनविण्याबाबत विचारविमर्श झाला. विशेषत: संयुक्त जनता दल असहिष्णुता आणि पुरस्कार वापसीचा मुद्दा संपूर्ण ताकदीनिशी उपस्थित करण्याच्या तयारीत आहे. ‘आता आसामच्या राज्यपालांनी संवैधानिक पदावर असतानाही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यावरून सरकारने बिहारमधील पराभवापासून कोणताही धडा घेतला नसल्याचे दिसते.
आम्ही लव जिहादपासून तर घर वापसी आणि दादरी हत्याकांड व वाढत्या असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करू,’ असे संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.
देशात आरक्षण धोरणाची योग्यरीत्या अंमलबजावणी केली जात नाही, असा आरोप करून संसद अधिवेशनात आरक्षण धोरणाचा मुद्दाही उपस्थित करणार असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले. याशिवाय संयुक्त जनता दलातर्फे डाळ, खाद्यतेल आणि पालेभाज्यांच्या भाववाढीचा मुद्दाही नियम २६७ अन्वये उपस्थित केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
२६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन साजरा करण्यासाठी आणि संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी पहिले दोन दिवस संसदेची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे.
दरम्यान वस्तू आणि सेवाकर विधेयकासह (जीएसटी) अन्य महत्त्वाची सुधारणा विधेयके पारित करण्यात काँग्रेसचा पाठिंबा मिळेल, अशी आशा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे डावपेच ठरविण्यासाठी मंगळवारी वरिष्ठ मंत्र्यांनी विचारविमर्श केला.

Web Title: The government's fire test on intolerance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.