सरकारची आता डिजिटल पेमेंट सेवा; ‘ई-रुपी’ सेवेस प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 07:43 AM2021-08-03T07:43:07+5:302021-08-03T07:43:48+5:30
e-Rupee’ service: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ‘ई-रुपी’ या डिजिटल पेमेंट सेवेचे उद्घाटन झाले. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांनी विकसित केलेले ‘ई-रुपी’ हे प्रीपेड व्हाऊचर आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ‘ई-रुपी’ या डिजिटल पेमेंट सेवेचे उद्घाटन झाले. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांनी विकसित केलेले ‘ई-रुपी’ हे प्रीपेड व्हाऊचर आहे. कोणत्याही मध्यस्थाशिवाय लाभार्थ्यांच्या खात्यात केंद्रीय योजनांचे लाभ जमा व्हावेत, यासाठी ही पेमेंट सेवा अधिक पारदर्शकपणे काम करेल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
डिजिटल सुशासनाला आज एक नवा आयाम मिळाला आहे. डिजिटल व्यवहारांबरोबरच केंद्राच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना आर्थिक लाभ थेट मिळण्याची प्रक्रिया आता अधिक परिणामकारक आणि सुटसुटीत होणार आहे. ‘ई-रुपी’ ही एक पारदर्शक पेमेंट सेवा आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान