महागाई कमी करण्यास सरकारचे प्राधान्य - राष्ट्रपती

By admin | Published: June 9, 2014 12:38 PM2014-06-09T12:38:01+5:302014-06-09T13:07:41+5:30

'सबका साथ, सबका विकास' हेच सरकारचे ध्येय असल्याचे सांगत महागाई कमी करणे, काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन,२०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबासाठी पक्के घर व २४ तास वीज अशा अनेक मुद्यांचा अजेंडा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिभाषणात मांडला.

Government's priority to reduce inflation - President | महागाई कमी करण्यास सरकारचे प्राधान्य - राष्ट्रपती

महागाई कमी करण्यास सरकारचे प्राधान्य - राष्ट्रपती

Next
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ९ - 'सबका साथ, सबका विकास' हेच सरकारचे ध्येय असल्याचे सांगत महागाई कमी करणे, काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन, महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षण, २०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबासाठी पक्के घर, शौचालय व २४ तास वीजपुरवठा अशा अनेक मुद्यांचा अजेंडा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिभाषणात मांडला. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान,सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. आपल्या अभिभाषणादरम्यान त्यांनी आगामी काळात देशाच्या विकासासाठी मोदी सरकारचा काय अजेंडा असेल, याचा आढावा जाहीर केला.
यावेळी त्यांनी लोकसभेच्या निवडणुका यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल निवडणूक आयोगाचे कौतुक केले, तसेच लोकसभेच्या दुस-या महिला सभापती सुमित्रा महाजन यांचेही अभिनंदन केले. 
 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे :- 
-नव्या सरकारला मिळालेले बहुमत हा आशेचा किरण. 
- सर्वांसोबत सर्वांचा विकास हेच ध्येय
- जनतेची सेवा करण्यासाठी तसेच गरिबी दूर करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असेल. 
- नव्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा नसेल. 
- दहशतवादाबाबत सरकार ठोस भूमिका घेणार. 
- काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्न करणार
- प्रत्येक कुटुंबासाठी पक्के घर, शौचालय, २४ तास वीजपुरवठा हे सरकारपुढील २०२२ पर्यंतचे लक्ष्य
- प्रत्येक गाव ब्रॉडबॅंडने जोडणार. 
- हाय स्पीड ट्रेन्ससाठी डायमंड क्वॉड्रिलेटरल प्रकल्प सुरू करणार
- काळा पैसा देशात परत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध
- 100 नवी शहरं बनवली जाणार
- महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षण देणार
- संरक्षण दलामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर- राष्ट्रपती
- राष्ट्रीय ई-लायब्ररीची स्थापना, तसेच प्रत्येक राज्यांत आयआयटी व आयआयएमची स्थापना करणार
- 'बेची बचाओ, बेटी बढाओ' योजनेअंतर्गत मुलींची संख्या वाढविण्यास मदत करणार.
- स्वच्छ भारत अभियान लौकरच सुरू होणार
- रोजगारवाढीसाठी पर्यटनावर भर देणार 
- रेल्वेमधील सुरक्षा आणखी मजबूत करणार - ऊर्जा क्षेत्राचा विकास करणार
- मदरशांना आधुनिक बनवणार.

 

Web Title: Government's priority to reduce inflation - President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.