आत्मनिर्भर भारतासाठी खासगी क्षेत्राला सरकारांनी द्यावा पाठिंबा- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 02:04 AM2021-02-21T02:04:21+5:302021-02-21T06:53:56+5:30

पंतप्रधान मोदी; केंद्र, राज्यांतील सहकार्य वाढवा

Governments should support the private sector for a self-reliant India | आत्मनिर्भर भारतासाठी खासगी क्षेत्राला सरकारांनी द्यावा पाठिंबा- पंतप्रधान मोदी

आत्मनिर्भर भारतासाठी खासगी क्षेत्राला सरकारांनी द्यावा पाठिंबा- पंतप्रधान मोदी

Next

नवी दिल्ली : भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी विविध सरकारांनी खासगी क्षेत्राला आणखी भक्कम पाठबळ दिले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. कोरोना साथीचे तडाखे बसलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्र व राज्यांतील सहकार्य आणखी वाढले पाहिजे, असेही ते म्हणाले.

निती आयोगाच्या सहाव्या बैठकीत शनिवारी मोदी यांनी सांगितले की, खासगी क्षेत्र आणखी वाढण्यासाठी विविध सरकारांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी खासगी क्षेत्राला भक्कम पाठिंबा द्यावा. कोरोना साथीचा सामना करण्यासाठी राज्ये व केंद्र सरकारने खांद्याला खांदा लावून काम केले. या लढ्यात भारताला यश मिळाले असून, आपल्या देशाची चांगली प्रतिमा जगभरात निर्माण झाली आहे.

निती आयोगाच्या बैठकीला पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गैरहजर होत्या. निती आयोगाच्या बैठकांतून काहीही निष्पन्न होत नव्हते. केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळालेले जम्मू-काश्मीर, लडाखचे प्रतिनिधी प्रथमच निती आयोगाच्या बैठकीला उपस्थित होते.

 

Web Title: Governments should support the private sector for a self-reliant India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.