अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मानधनवाढीवर सरकारचे मौन

By admin | Published: April 8, 2017 12:23 AM2017-04-08T00:23:06+5:302017-04-08T00:23:06+5:30

अंगणवाडी कार्यकर्तींचे मानधन वाढवण्यासंदर्भात आश्वासन देण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने शुक्रवारी मौन बाळगले.

Government's silence on the rise of Anganwadi workers | अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मानधनवाढीवर सरकारचे मौन

अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मानधनवाढीवर सरकारचे मौन

Next

नवी दिल्ली : अंगणवाडी कार्यकर्तींचे मानधन वाढवण्यासंदर्भात आश्वासन देण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने शुक्रवारी मौन बाळगले. मात्र, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या या महिला कार्यकर्त्यांचे मानधन वाढवण्यास राज्य सरकारे मुक्त आहेत, असेही स्पष्ट केले.
महिला व बालविकासमंत्री कृष्णा राज यांनी लोकसभेत सांगितले की, अंगणवाडी कार्यकर्त्यांना मासिक मानधन दिले जाते व त्यात वेळोवेळी सरकारने ५ टक्के वाढ केलेली आहे. अंगणवाडी कार्यकर्त्या व सहाय्यकांना २०११ पासून अनुक्रमे ३,००० व १,५०० रुपये मासिक मानधन दिले जाते. यातील ६० टक्के निधी केंद्राचा व उर्वरित राज्याचा असतो. काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेणुगोपाल तसेच तृणमूलच्या अर्पिता घोष यांनीही अंगणवाडी कार्यकर्त्यांचे मानधन वाढवण्याची मागणी केली. वित्तमंत्र्यांनी थोडी दया दाखवावी, असे खरगे म्हणाले.

Web Title: Government's silence on the rise of Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.