काळ्या पैशावरून सरकारची कोंडी!

By admin | Published: November 26, 2014 03:00 AM2014-11-26T03:00:24+5:302014-11-26T03:02:11+5:30

तृणमूल सदस्यांनी अधिक आक्रमक पवित्र घेत, ‘काला पैसा वापस लाओ’ अशा घोषणा लिहिलेल्या काळ्या छत्र्या दाखवत सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न केल़े

The government's stance on black money! | काळ्या पैशावरून सरकारची कोंडी!

काळ्या पैशावरून सरकारची कोंडी!

Next
संसदेत गदारोळ : चर्चा नको, माफी मागा -विरोधकांची मागणी
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
विदेशातील काळा पैसा परत आणू, या मोदी सरकारच्या आश्वासनावर विरोधकांनी एकजूट होत, आज (मंगळवारी) संसदेत जोरदार गोंधळ घातला़ काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, आम आदमी पार्टी आणि संयुक्त जनता दल आदी पक्षांच्या सदस्यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच नारेबाजी सुरू केली़ तृणमूल सदस्यांनी अधिक आक्रमक पवित्र घेत, ‘काला पैसा वापस लाओ’ अशा घोषणा लिहिलेल्या काळ्या छत्र्या दाखवत सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न केल़े 
विरोधकांच्या या कोंडीने  सरकारच्या चेह:यावरील चिंता स्पष्ट दिसत होत्या़ याचमुळे संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांना उभे होत, सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे सांगावे लागल़े विरोधकांनी मात्र चर्चेचा हा प्रस्ताव धुडकावून लावला़ लोकसभाध्यक्ष सुमित्र महाजन यांनी, विरोधकांची कोंडी फोडण्याचे प्रयत्न केले; मात्र विरोधक त्यालाही बधले नाहीत़ विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल़े
‘काला धन वापस लाओ’, ‘वापस लाओ-वापस लाओ,  ‘अच्छे दिन कहाँ हैं, मोदी जबाब दो’ अशा घोषणा संसदेच्या दोन्ही सभागृहात उठल्या़ सोनिया गांधी आणि मुलायमसिंग हेही या गोंधळात सक्रिय झालेले दिसल़े ज्योतिरादित्य शिंदे, राजीव सातव, जयप्रकाश यांच्यासह तृणमूल काँग्रेस सदस्य अतिशय आक्रमक पावित्र्यात दिसल़े  तत्पूर्वी तृणमूल सदस्यांनी संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या दिला़ खासदारांना मुख्य प्रवेशद्वारावर रोखण्याचा त्यांचा हेतू होता़ काही क्षणात मुलायमसिंग आणि शरद यादव हेही त्यांच्यात सामील झाल़े एकंदर काळ्या पैशाच्या मुद्यावर विरोधक चांगलेच एकजूट दिसल़े
 संसदेबाहेर काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला़ पक्षाचे सरचिटणीस शकील अहमद यांनी मोदी सरकार काळ्या पैशाच्या मुद्यावर सरकारची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला़ भाजपा सत्तेत आल्यास 1क्क् दिवसांत काळा पैसा परत आणू, असे आश्वासन 17 एप्रिल 2क्14 रोजी राजनाथसिंह यांनी देशाला दिले होत़े प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख जमा करण्याचे स्वप्नही मोदी सरकाने दाखवले होत़े विदेशी सरकारसोबत झालेल्या करारांमुळे विदेशातील भारतीय खातेदारांचे नाव उघड करता येणार नाही, असे काँग्रेस सरकार सांगत होते तेव्हा विरोधी बाकांवरून भाजपा टीका करीत होती़ आज भाजपा सत्तेत आहे आणि काँग्रेस सरकार म्हणत होते, तेच आज लोकांना सांगत आहे, अशी टीका अहमद यांनी केली़
 उच्चपदस्थ सूत्रंनुसार, आज विरोधकांची एकजूटता बघून सर्वच मुद्यांवर एक सामायिक डावपेच आखून मोदी सरकारला घेरण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत़ मोदी सरकारला विरोधकांच्या शक्तीचा प्रत्यय यावा, यासाठी यादिशेने काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत़ सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात सोनिया गांधी आणि मुलायमसिंग यांच्यात चर्चाही झाली आह़े हैदराबादेत राजीव गांधी नाव हटवून बेगमपेठ विमानतळाला एनटीआर यांचे नाव देण्याचे प्रयत्न आहेत, हा मुद्दाही काँग्रेस लावून धरणार आह़े
 
लोकसभाध्यक्ष सुमित्र महाजन सदस्यांवर नाराज
काळ्या पैशाच्या मुद्दय़ावर गोंधळ सुरू असताना काही विरोधी सदस्यांनी काळ्या छत्र्या उघडल्या़ काला पैसा वापीस लाओ, असे त्यावर लिहिले होत़े लोकसभाध्यक्ष सुमित्र महाजन यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली़
 
सरकारचा पलटवार
काळ्या पैशाच्या मुद्दय़ावर गळा काढणारी काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांकडून प्रत्यक्षात काळा पैसा असणा:यांचा बचाव करण्याचे प्रयत्न सुरूआहेत, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाल़े सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अडीच वष्रे आधीचे संपुआ सरकार या मुद्दय़ावर ढिम्म होत़े आम्ही मात्र सत्तेत येताच अडीच दिवसांत या मुद्दय़ावर एसआयटी स्थापन केली़ 
तृणमूलच्या काळ्या छत्र्या
तृणमूल सदस्यांनी मोदी ताणाशाही नही चलेगी, काला धन वापस लाओ, असे लिहिलेल्या काळ्या छत्र्या घेऊन सरकारविरोधात जोरदार नारेबाजी केली़ लोकसभेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ठिय्या दिला़ शिवाय संसदेचे कामकाज हाणून पाडण्याचा इशारा दिला़
 
चर्चेस तयार
काळ्या पैशाबाबत चर्चेसाठी सरकार तयार असल्याचे भाजपाने स्पष्ट केल़े विदेशातील काळा पैसा परत आणण्यास कटिबद्ध आहोत़ काळा पैसा परत आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न चालवले आहेत आणि ते आम्ही सर्वासमोर मांडू, असे संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी म्हणाल़े 
 
मुलायमसिंग यांचा सवाल; कोठे आहे काळा पैसा?
सत्तेवर येताच 1क्क् दिवसांत विदेशातील काळा पैसा परत आणू, असे आश्वासन सरकारने दिले होत़े आज सहा महिने झालेत़ कुठे आहे काळा पैसा, असा खोचक सवाल समाजवादी पार्टीचे सुप्रीमो मुलायमसिंग यादव यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना केला़

 

Web Title: The government's stance on black money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.