नोकरी सोडायची असल्यास आरबीआय गव्हर्नरने सरकारला नडावे : मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 12:36 PM2018-11-07T12:36:11+5:302018-11-07T12:37:50+5:30

आरबीआय गव्हर्नर आणि अर्थमंत्र्यांमधील वादावरून मनमोहन सिंग यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे.

Governor Only Oppose Finance Minister When He Wants To Quit RBI's Job : Manmohan Singh | नोकरी सोडायची असल्यास आरबीआय गव्हर्नरने सरकारला नडावे : मनमोहन सिंग

नोकरी सोडायची असल्यास आरबीआय गव्हर्नरने सरकारला नडावे : मनमोहन सिंग

Next

नवी दिल्ली : आरबीआय गव्हर्नर आणि अर्थमंत्र्यांमधील वादावरून मनमोहन सिंग यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे. मनमोहन यांनी त्याच्या मुलीने लिहिलेल्या पुस्तकात म्हटले होते, की अर्थमंत्रीपद हे आरबीआय गव्हर्नरपेक्षा वरचे असते. मनमोहन सिंग हे आरबीआय गव्हर्नरही होते. हा गव्हर्नर सरकारला तेव्हाच नडू शकतो, जेव्हा त्याने नोकरी सोडण्याचे ठरविले असले पाहिजे, असे या पुस्तकात म्हटले आहे. हे पुस्तक 2014 मध्ये प्रकाशित झाले होते. 


आरबीआयमधील काम केलेल्या दिवसांची आठवण सांगताना सिंग यांनी गव्हर्नरला कोणताही निर्णय घेताना आधी सरकारची मंजुरी घ्यावी लागते. अर्थमंत्र्यांचे पद मोठे असल्याने गव्हर्नरला त्यांच्या सूचना टाळता येत नाहीत. जर त्याला नोकरी सोडायची असेल तरच तो मंत्र्यांशी वाद घालू शकतो, असे म्हटले आहे. 


इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सिंग हे गव्हर्नर होते. त्यावेळीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मी त्यांना आरबीआयची भुमिका स्पष्ट केली आणि इच्छा नसेल तर निर्णय फेटाळण्यासही सांगितले होते. ती एक सरकारी योजना होती. सरकारने आरबीआयला आदेश देऊन हा वाद संपवला, अशीही आठवण त्यांनी या पुस्तकामध्ये दिली आहे. 
दमन सिंग यांनी स्ट्रिक्टली पर्सनल: मनमोहन गुरुशरण हे पुस्तक लिहिले आहे. 

Web Title: Governor Only Oppose Finance Minister When He Wants To Quit RBI's Job : Manmohan Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.