जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू

By admin | Published: January 9, 2015 07:55 PM2015-01-09T19:55:17+5:302015-01-09T19:55:17+5:30

जम्मु - काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. सरकार स्थापन करण्यास ८७ उमेदवारांची मतं जमवण्यात कोणत्याही पक्षाला यश न आल्याने राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.

Governor's rule is implemented in Jammu and Kashmir | जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू

जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू

Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ९ - जम्मु - काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. सरकार स्थापन करण्यास ८७ उमेदवारांची मतं जमवण्यात कोणत्याही पक्षाला यश न आल्याने राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. २० डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या निवडणुकांत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्रिशंकु परिस्थिती उद्भवली असताना जम्मु- काश्मीरमधील सरकार बनवण्यावरून अनेक पेच प्रसंग निर्माण झाले होते. ओमर अब्दुल्ला यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल एन.एन व्होरा यांच्याकडे सोपवला होता. राज्यपालांनी या बाबतचा अहवाल केंद्राकडे पाठवला असता राषअट्रपती राजवटीसह इतर काही पर्याय सुचवले होते. शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता जम्मु - काश्मीरचे मुख्य सचिव इक्बाल खांडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही तासांतच राज्यपाल राजवट जाहीर करण्यात आली. डिसेंबर २०१४ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांत पीडीपी या पक्षाने २८ जागा मिळवल्या असताना २५ जागांवर विजयी होणा-या भाजपा सोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन होण्याच्या शक्यता फोल ठरली. त्याचप्रमाणे नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेसला अनुक्रमे १५ व १२ जागा मिळाल्या होत्या. 
 

Web Title: Governor's rule is implemented in Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.