केंद्रातील सरकार ऑगस्टपर्यंत कोसळेल, तयारीला लागा; INDIA आघाडीतील मोठ्या नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 08:50 AM2024-07-06T08:50:40+5:302024-07-06T08:51:54+5:30

केंद्र सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही.

Govt at center to collapse by August, get ready; A claim by a senior leader Lalu Yadav in the INDIA front | केंद्रातील सरकार ऑगस्टपर्यंत कोसळेल, तयारीला लागा; INDIA आघाडीतील मोठ्या नेत्याचा दावा

केंद्रातील सरकार ऑगस्टपर्यंत कोसळेल, तयारीला लागा; INDIA आघाडीतील मोठ्या नेत्याचा दावा

एस. पी. सिन्हा

पाटणा : केंद्र सरकार अत्यंत कमकुवत असून, ते ऑगस्टपर्यंत कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुका कधीही होऊ शकतात. यासाठी तयारीला लागा, असे लालू प्रसाद यादव यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटले आहे.

राष्ट्रीय जनता दलाने शुक्रवारी आपला २८ वा स्थापना दिवस साजरा केला. यावेळी लालू प्रसाद यादव व तेजस्वी यादव यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. डिसेंबर २०२४ किंवा २०२५ मध्ये जेव्हाही विधानसभा निवडणुका होतील तेव्हा बिहारमध्ये इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा दावा लालू यादव यांनी केला. निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आवाहन तेजस्वी यांनी केले.

जदयूची सत्तेसाठी विचारसरणीशी तडजोड
तेजस्वी यादव म्हणाले की, केंद्र सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. आम्ही लोकसभेत चांगली लढत दिली, जर आम्हाला आणखी काही जागा मिळाल्या असत्या तर पंतप्रधान सत्तेत राहिले नसते. तेजस्वी यादव यांनी जदयूवर भाजपसोबत युती करून सत्तेसाठी आपल्या विचारसरणीशी तडजोड केल्याचा आरोप केला.

Web Title: Govt at center to collapse by August, get ready; A claim by a senior leader Lalu Yadav in the INDIA front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.