जेव्हा भाजपाचे 'मंत्रिमहोदय' सरकारी कर्मचाऱ्याकडून बूट घालून घेतात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 12:38 PM2019-06-22T12:38:34+5:302019-06-22T12:51:03+5:30
भाजप मंत्र्यांचा व्हीआयपी कल्चर काही सुटता सुटेना.
नवी दिल्ली - व्हीआयपी कल्चर सोडून जनतेमध्ये सामील होऊन कामे करावीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याचा आता भाजपच्याच मंत्र्यांना विसर पडला आहे. उत्तर प्रदेशमधील शाहजहांपुर येथे योगा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्यावेळी भाजपचे मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांच्या पायात सरकारी कर्मचारी बूट घालत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी उत्तर देताना चौधरी यांनी स्वता:ची तुलना रामाशी केली.
भाजप मंत्र्यांचा व्हीआयपी कल्चर काही सुटता सुटेना. याच ताज उदाहरण म्हणजे योगी सरकारमध्ये असलेले मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी. योगा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात खाली वाकण्याचे जीवावर आल्याने या मंत्रीमहोदयांनी चक्क सरकारी कर्मचारीकडून आपला बूट पायात घालून घेतले. विशेष म्हणजे हा व्हिडिओ सोशल मिडीयावर वायरल झाला आहे.
#WATCH: UP Minister Laxmi Narayan gets his shoelace tied by a government employee at a yoga event in Shahjahanpur, yesterday. pic.twitter.com/QbVxiQM7bI
— ANI UP (@ANINewsUP) June 22, 2019
चौधरी हे एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांना याप्रकरणी माध्यमांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी स्वता:ची तुलना थेट रामाशी करून टाकली. तर, बूट पायात घालणाऱ्या कर्मचाऱ्याला रामाचा भाऊ भरत यांची उपमा दिली. भाऊ किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्ती जर आपल्या पायात बूट घालत असेल तर, आमचा हा असा एक देश आहे, जिथे रामाची 'पादत्राणे' राज सिंहासनावर ठेवून त्यांचे भाऊ भरत यांनी १४ वर्ष राज्य केले होते. असे चौधरी म्हणाले.