तिहेरी तलाक पीडितांना मिळणार वर्षाला 6 हजार रुपये पेन्शन?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 07:35 PM2019-12-28T19:35:15+5:302019-12-28T19:35:49+5:30

पहिल्या टप्प्यात 5 हजार पीडित महिलांसाठी पेन्शन दिली जाणार?

UP govt to give Rs 6000 as annual pension to 'triple talaq' victims | तिहेरी तलाक पीडितांना मिळणार वर्षाला 6 हजार रुपये पेन्शन?

तिहेरी तलाक पीडितांना मिळणार वर्षाला 6 हजार रुपये पेन्शन?

Next

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने तिहेरी तलाक पीडित महिलांना पुढील वर्षापासून पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार तिहेरी तलाक पीडित महिलांना वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

यासंबंधीचा प्रस्ताव सरकारने तयार केला असून पुढील कॅबिनेटच्या बैठकीत मांडला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एफआयआर किंवा फॅमिली कोर्टातील खटल्याच्या आधारावर ही पेन्शन दिली जाणार आहे. यासाठी सरकारने राज्यातील तिहेरी तलाक पीडित 5 हजार महिलांची नोंद घेतली आहे. पहिल्या टप्प्यात या पीडित महिलांसाठी पेन्शनची योजना लागू करण्यात येणार असल्याचे समजते. 

दरम्यान, तिहेरी तलाक गुन्हा असल्याचे घोषित केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पीडित महिलांना मदत करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी ज्या मुस्लीम महिलांना पतीने तिहेरी तलाक देऊन वाऱ्यावर सोडले आहे, त्या पीडित महिलांना सरकार दरवर्षी 6 हजार रुपये देणार असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली होती. तिहेरी तलाक पीडित महिलांची भेट घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी ही माहिती दिली होती. याशिवाय, मुस्लीम महिलांसोबतच हिंदू महिलांनाही न्याय देणार असल्याचे आश्वासन योगी आदित्यनाथ दिले होते. 
 

Web Title: UP govt to give Rs 6000 as annual pension to 'triple talaq' victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.