अधिकाऱ्याचा सेल्फी पडला महागात! 'त्या' अधिकाऱ्याला ५३ हजारांचा झाला दंड, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 01:20 PM2023-05-31T13:20:04+5:302023-05-31T13:21:07+5:30

सध्याचा काळ हा डिजीटलचा काळ आहे. सेल्फीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलंय.

govt official drained reservoir to search samsung galaxy s23 ultra fine 53 lakh | अधिकाऱ्याचा सेल्फी पडला महागात! 'त्या' अधिकाऱ्याला ५३ हजारांचा झाला दंड, नेमकं काय घडलं?

अधिकाऱ्याचा सेल्फी पडला महागात! 'त्या' अधिकाऱ्याला ५३ हजारांचा झाला दंड, नेमकं काय घडलं?

googlenewsNext

गेल्या काही दिवसापूर्वी छत्तीसगडमध्ये एका अधिकाऱ्याने स्वत:चा मोबाईल शोधण्यासाठी तलावातील ४२ लाख लीटर पाणी खाली केल्याची घटना समोर आली होती. या संदर्भात आता एक अपडेट आली आहे. येथे एका अधिकाऱ्याचा मोबाईल एका तलावाच्या बाजूला सेल्फी घेत असताना तलावात पडतो. मोबाईल शोधण्यासाठी त्या अधिकाऱ्याने तलावातील सर्व पाणी बाहेर काढले. यानंतर या अधिकाऱ्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. 

भारतीय सैन्याचे मोठे यश! लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, ३ जणांना जीवंत पकडले

या अधिकाऱ्याचा सॅमसंग कंपनीचा गॅलक्सी S23 हा मोबाईल पाण्यात पडला होता. या मोबाईलची किंमत १.२५ लाख रुपये होती. अन्न निरीक्षक राजेश विश्वास (३२) हे छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील पखंजूर येथे तैनात होते. एके दिवशी अधिकारी विश्वास एका मित्रासोबत परळकोट तलावाजवळ पिकनिकसाठी गेले होते, तिथे ते सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा Samsung Galaxy S23 Ultra हा फोन तलावात पडला. यावेळी ते पाटबंधारे विभागाकडे मदतीसाठी गेले. यानंतर फोन शोधण्यासाठी दोन डिझेल पंप भाड्याने घेण्यात आले. प्रत्येक डिझेल पंपाची किंमत सुमारे ७,५०० रुपये होती, ज्याचा उपयोग तलावातून पाणी बाहेर काढण्यासाठी केला होता.

सुरुवातीला तलावातून २१ लाख लिटर पाणी बाहेर काढण्यात आले. मात्र या प्रकरणाचा तपास केला असता धरणातून सुमारे ४१ लाख लिटर पाणी काढण्यात आल्याचे समोर आले. मात्र, एवढ्या प्रयत्नानंतरही फोन ट्रेस होऊ शकला नाही. मात्र या प्रकरणात सरकारी यंत्रणेचा वैयक्तिक वापर केल्यामुळे विश्वास यांना नोटीस पाठवून उत्तर मागवण्यात आले. तसेच धरणातून पाणी काढल्याबद्दल विश्वास यांना ४२,०९२ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच १० हजार रुपयांचा अतिरिक्त दंडही ठोठावण्यात आला आहे.

इतर अधिकाऱ्यांनाही नोटीस 

तलाव रिकामे करण्याचे निर्देश देणारे अधिकारी आर.सी.धीवार यांना वरिष्ठांच्या परवानगीशिवाय तलाव रिकामे करण्याच्या सूचना कशा दिल्या, याबाबत नोटीसही बजावण्यात आली आहे.

Web Title: govt official drained reservoir to search samsung galaxy s23 ultra fine 53 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.