UGC NET postponed: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर UGC NET परीक्षा पुढे ढकलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 05:58 PM2021-04-20T17:58:21+5:302021-04-20T17:58:50+5:30
२ मेपासून पार पडणार होत्या परीक्षा. NTA नं जारी केलं पत्रक
NTA UGC NET Exam 2021 postponed: गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं पुन्हा एकजा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. देशात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय घेत UGC NET ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं मंगळवारी २० एप्रिल रोजी पत्रक काढून याबाबत माहिती दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी यासंदर्भातील ट्वीट केलं आहे.
२०२० सायकलसाठी (मे २०२१) UGC NET ही परीक्षा २ मे ते १७ मे २०२० या कालावधीत कंम्प्युटर मोडमध्ये होणार होती. परंतु सध्याची परिस्थिती आमि विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे पाहता पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असं एनटीएनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
📢Announcement
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) April 20, 2021
Keeping in mind the safety & well-being of candidates and exam functionaries during #covid19outbreak, I have advised @DG_NTA to postpone the UGC-NET Dec 2020 cycle (May 2021) exams.#Unite2FightCoronapic.twitter.com/5dLB9uWgkO
सध्या ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असली तरी केव्हा घेतली जाईल याची माहिती देण्यात आलेली नाही. परीक्षेच्या १५ दिवस अगोदर विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नव्या तारखांबाबत माहिती दिली जाईल. असंही एनटीएनं सांगितलं. तसंच एनटीए आणि युजीसीची वेबसाईटही पाहत राहण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आल्या आहेत. या परीक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारची अधिक माहिती घेण्यासाठी एनटीएचा हेल्पलाईन क्रमांक 011-40759000 यावर संपर्क साधू शकता. तसंच ugcnet@nta.ac.in यावर ईमेल पाठवूनही माहिती घेता येईल.