पत्नीवर गोळ्या झाडण्यापेक्षा तिहेरी तलाक देणे चांगले, सपा खासदाराची मुक्ताफळे 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 02:39 PM2019-07-25T14:39:26+5:302019-07-25T14:40:07+5:30

तिहेरी तलाक विधेयकावर आज लोकसभेमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

Govt shouldn't interfere with internal matter of any religion - ST Hasan, SP MP | पत्नीवर गोळ्या झाडण्यापेक्षा तिहेरी तलाक देणे चांगले, सपा खासदाराची मुक्ताफळे 

पत्नीवर गोळ्या झाडण्यापेक्षा तिहेरी तलाक देणे चांगले, सपा खासदाराची मुक्ताफळे 

googlenewsNext

नवी दिल्ली - तिहेरी तलाक विधेयकावर आज लोकसभेमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, पत्नीवर गोळी झाडण्यापेक्षा तिहेरी तलाक देऊन नाते संपवणे कधीही चांगले, असे वक्तव्य  करत सपाचे खासदार एस.टी. हसन यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. तसेच कुठल्याही धर्माच्या वैयक्तिक बाबीत सरकारने हस्तक्षेप करता कामा नये, असेही त्यांनी म्हटले आहे. 

''कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते ज्यामध्ये पती-पत्नीने विभक्त होणे हाच एक मार्ग उरतो. मग अशा परिस्थितीत पत्नीवर गोळी झाडण्यापेक्षा तिला तिहेरी तलाक देणेच योग्य ठरते. तसेच केवळ हजरत अबू हनिफा यांना मानणारे लोकच एकावेळी तीन तलाक देतात. आता अबू हनिफांना मानणाऱ्यांसोबत निकाह करावा का हे मुलीच्या कुटुंबीयांवरच सोडणे योग्य ठरेल.'' असे एसटी हसन यांनी सांगितले.

 

मुस्लिम महिलांच्या न्यायासंदर्भात एच. टी. हसन म्हणाले की, इस्लामने महिलांसोबत खूप न्याय केलेला आहे. त्यांची जेव्हा इच्छा होईल तेव्हा त्या पतीपासून खुला घेऊ शकतात. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये बदल करणे आणि शरियतमध्ये बदल करणे चुकीचे आहे. जर कुठल्याही पुरुषाला तुम्ही तीन तलाक दिले म्हणून तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावत असाल तर तो आपल्या कुटुंबाला पोटगी कशी देऊ शकेल. हे चुकीचे नाही का. हिंदू आणि ख्रिश्चन पुरुषांना एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. मग मुस्लिमांना तीन वर्षांची शिक्षा का, असा सवाल त्यांनी केला.  

Web Title: Govt shouldn't interfere with internal matter of any religion - ST Hasan, SP MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.