Fact Check : पीएम कन्या आशीर्वाद योजनेअंतर्गत 5000 रुपये मिळणार?; जाणून घ्या, 'त्या' मेसेजमागचं नेमकं 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 02:24 PM2022-09-04T14:24:11+5:302022-09-04T15:32:18+5:30

केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजना सुरू केली असून सरकार या योजनेंतर्गत प्रत्येक मुलीला 5,000 रुपयांची आर्थिक मदत देत असल्याचा दावा एका यूट्यूब व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.

govt to give rs 5000 every month to daughters under pm kanya ashirwad yojana pib fact check | Fact Check : पीएम कन्या आशीर्वाद योजनेअंतर्गत 5000 रुपये मिळणार?; जाणून घ्या, 'त्या' मेसेजमागचं नेमकं 'सत्य'

Fact Check : पीएम कन्या आशीर्वाद योजनेअंतर्गत 5000 रुपये मिळणार?; जाणून घ्या, 'त्या' मेसेजमागचं नेमकं 'सत्य'

googlenewsNext

सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजनेअंतर्गत प्रत्येक मुलीला दरमहा 5000 रुपये दिले जातील असा दावा या मेसेजमध्ये केला जात आहे. सरकारने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या मेसेजशी संबंधित स्पष्टीकरण दिले आहे.

केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजना सुरू केली असून सरकार या योजनेंतर्गत प्रत्येक मुलीला 5,000 रुपयांची आर्थिक मदत देत असल्याचा दावा एका यूट्यूब व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.

भारत सरकारची प्रेस एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच पीआयबीने या व्हायरल मेसेजची सत्यता सांगितली आहे. पीआयबी फॅक्ट चेक हँडलच्या वतीने ट्विट करून हा दावा खोटा असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबवली जात नाही.

सरकारशी संबंधित कोणतीही दिशाभूल करणारी बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत देखील घेऊ शकता. PIB FactCheck या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 918799711259 वर किंवा pibfactcheck@gmail.com वर मेल करून कोणीही दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा URL पाठवू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: govt to give rs 5000 every month to daughters under pm kanya ashirwad yojana pib fact check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.