आणखी नऊ महिने पुरेल इतका देशात धान्यसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 05:33 AM2020-04-14T05:33:14+5:302020-04-14T05:33:36+5:30

रामविलास पासवान; जनतेने चिंता करू नये, आगामी काळात होणार गव्हाचे विक्रमी उत्पादन

Grain stocks in the country for another nine months | आणखी नऊ महिने पुरेल इतका देशात धान्यसाठा

आणखी नऊ महिने पुरेल इतका देशात धान्यसाठा

Next

नवी दिल्ली : सार्वजनिक शिधावाटप यंत्रणेचे लाभार्थी असलेल्या ८१ कोटी नागरिकांना आणखी नऊ महिने पुरेल इतका मोठा अन्नधान्य साठा
सध्या देशात आहे असे केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. आगामी काळात देशामध्ये गव्हाचेही विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता असून, त्याचीही अन्नधान्याच्या साठ्यात भर पडणार आहे.

कोरोनाचा आणखी फैलाव होऊ नये म्हणून केंद्र सरकारने लागू केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत उद्या, १४ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर रामविलास पासवान म्हणाले की, कोरोना साथीच्या काळात देशामध्ये अन्नधान्याची वाहतूक व वाटप अतिशय कार्यक्षमतेने झाले असून ही ऐतिहासिक कामगिरी आहे. १० एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार सरकारी गोदामांमध्ये सध्या तांदळाचा २९९.४५ लाख मेट्रिक टन, गव्हाचा २३५.३३ लाख मेट्रिक टन इतका मोठा साठा आहे. सार्वजनिक शिधावाटप यंत्रणेद्वारे देशात दर महिन्याला ६० मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप केले जाते. त्यामध्ये डाळींचाही समावेश आहे.

‘अंत्योदय’च्या लाभार्थींना ५ किलो जादा धान्य
कोरोना संकटाच्या काळात सार्वजनिक शिधावाटप यंत्रणेच्या सर्व लाभार्थींना तीन महिन्यांचे अन्नधान्य एकाचवेळी व तेही मोफत देण्यात येईल, अशी घोषणा केंद्राने याआधीच केली आहे. अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना दर महिन्याला ३५ किलो अन्नधान्य शिधावाटप यंत्रणेद्वारे देण्यात येते; पण आता त्यांना आणखी पाच किलो अन्नधान्य देण्यात येणार आहे.

या वर्षातील पहिल्या ३ महिन्यांत असलेला साठा (आकडे लाख मेट्रिक टनमध्ये)
अन्न जानेवारी फेब्रुवारी मार्च
तांदूळ २३७.१५ २७४.५१ ३०९.७६
गहू ३२७.९६ ३०३.६६ २७५.२१

अन्न जानेवारी फेब्रुवारी मार्च
धान २७८.८७ २५८.९६ २८७.०८
भरड धान्य ३.२४ ३.२४ ०.२४

Web Title: Grain stocks in the country for another nine months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.