ग्रामपंचायतींच्या चाव्या जाणार महिलांच्या हाती ग्रामपंचायत आरक्षण सोडत: 369 ग्रामपंचायतींवर महिला सरपंचांची वर्णी

By Admin | Published: March 28, 2015 01:43 AM2015-03-28T01:43:46+5:302015-03-28T01:43:46+5:30

सोलापूर: अकरा तालुक्यात असलेल्या 1 हजार 32 ग्रामपंचायत आरक्षणाची सोडत शुक्रवारी झाली. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 338 ग्रामपंचायतींच्या कारभाराची चावी महिला सरपंचांच्या हाती जाणार असून, या ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती महिलांची वर्णी लागणार आहे.

Gram panchayat quits reservation in gram panchayat's women: 369 gram panchayats women sarpanchs | ग्रामपंचायतींच्या चाव्या जाणार महिलांच्या हाती ग्रामपंचायत आरक्षण सोडत: 369 ग्रामपंचायतींवर महिला सरपंचांची वर्णी

ग्रामपंचायतींच्या चाव्या जाणार महिलांच्या हाती ग्रामपंचायत आरक्षण सोडत: 369 ग्रामपंचायतींवर महिला सरपंचांची वर्णी

googlenewsNext
लापूर: अकरा तालुक्यात असलेल्या 1 हजार 32 ग्रामपंचायत आरक्षणाची सोडत शुक्रवारी झाली. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 338 ग्रामपंचायतींच्या कारभाराची चावी महिला सरपंचांच्या हाती जाणार असून, या ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती महिलांची वर्णी लागणार आहे.
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सरपंच, उपसरपंच निवडणूक नियम 1964 मधील 2 अ नुसार सन 1995, 2000, 2005, 2010 नुसार 2011 च्या जनगणनेनुसार उतरत्या क्रमाने हे आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षणामुळे सर्वसाधारण महिलेला 223 ग्रामपंचायतींवर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 97, अनुसूचित जातीच्या महिलेला 48 तर अनुसूचित जमाती महिलेला एका ग्रामपंचायतीवर कारभार करण्याची संधी मिळणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग 188, सर्वसाधारण 319, अनुसूचित जाती 115, अनुसूचित जमाती 12 अशा ग्रामपंचायतींवर सर्वाधिक महिलांना सरपंचपदासाठी संधी मिळणार असल्याने यंदा ग्रामपंचायतींवर महिलाराज अवतरणार आहे.
इन्फो बॉक्स
जिल्?ातील ग्रामपंचायती
जिल्?ात आरक्षण जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या अशी: माढा 109, अक्कलकोट 117, माळशिरस 108, बार्शी 130, दक्षिण सोलापूर 83, मोहोळ 92, पंढरपूर 94, उत्तर सोलापूर 36, मंगळवेढा 79, सांगोला 76,करमाळा 105 अशा ग्रामपंचायती आहेत. यावर सर्वाधिक संख्येने महिला सरपंच होणार असून, त्यानंतर 320 ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे.

Web Title: Gram panchayat quits reservation in gram panchayat's women: 369 gram panchayats women sarpanchs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.