ग्रामपंचायतीला कुलूप ठोकणार?
By admin | Published: August 2, 2016 11:46 PM2016-08-02T23:46:20+5:302016-08-02T23:46:20+5:30
नशिराबाद : मुख्यत: पाणी, रस्त्यांसह मूलभूत समस्या सोडविण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. आठ दिवसात समस्यांवर मात न झाल्यास निष्काळजी व ढिम्मपणाबाबत ग्रामपंचायतीला कुलूप ठोकावे? असा निर्धार स्मार्ट व्हिलेज समिती व ग्रामस्थांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
Next
न िराबाद : मुख्यत: पाणी, रस्त्यांसह मूलभूत समस्या सोडविण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. आठ दिवसात समस्यांवर मात न झाल्यास निष्काळजी व ढिम्मपणाबाबत ग्रामपंचायतीला कुलूप ठोकावे? असा निर्धार स्मार्ट व्हिलेज समिती व ग्रामस्थांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.माजी खासदार वाय.जी.महाजन अध्यक्षस्थानी होते. स्मार्ट व्हिलेज समितीने ग्रामपंचायतीला गावातील समस्यांबाबत महिनाभरापूर्वी निवेदन देऊन पाठपुरावा केला. मात्र प्रमुख समस्या कायमच असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. रस्त्यांची डागडुजी केली की था मस्करी मांडली असल्याचे सांगून गावातील विविध समस्यांबाबत उहापोह झाला. पावसाळ्यात आठवडा उलटूनही पाणी मिळत नसल्याने ग्रामपंचायतीच्या नियोजनाबाबत ताशेरे ओढले.समितीच्या कार्याला राजकारणाचा रंग चढत असून दिशा भरकटत असल्याचा आक्षेप प्रा.अरुण पाटील यांनी घेतला. बैठकीला स्मार्ट समितीचे सदस्यच उदासीन आहे. त्यांची उपस्थिती नसल्याबाबतही त्यांनी उहापोह केला.ग्रामविकास व्हावा हीच माझी तळमळ आहे. सत्ताधार्यांनी खुर्चीची लाज ठेवा. नीतीमत्ता शाबूत ठेवा. जनतेचे कामे करा, कुणावर आरोप करावा हा माझा हेतू नाही; पण नियोजन करा. ग्रामविकास साधा, एकत्र या असे आवाहन माजी खासदार वाय.जी.महाजन यांनी केले.बैठकीला स्मार्ट समितीचे अध्यक्ष विनायक धर्माधिकारी, दगडू माळी, बंडू रत्नपारखे, बी.आर.खंडारे, रत्नाकर पांढारकर, शे.रियाज, प्रा.अरुण पाटील, पंकज तारकस, उदय चौधरी, बापू चौधरी, बबन वाणी, संजय पाटील, किशोर पिंगळे आदी उपस्थित होते.