ग्रा.पं.कर्मचार्यांची जि.प.वर धडक
By admin | Published: February 22, 2016 07:28 PM2016-02-22T19:28:47+5:302016-02-22T19:28:47+5:30
जळगाव- ग्रा.पं.कर्मचार्यांना शासन निर्देशानुसार वेतन मिळावे, राहणीमान भत्ता लागू करावा, वेतन थकीत असलेल्या कर्मचार्यांना तातडीने वेतन द्यावे, भविष्य निर्वाह निधी न भरणार्या ग्रा.पं.वर कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी ग्रा.पं.कर्मचारी महासंघाच्या (आयटक) नेतृत्वामध्ये सोमवारी दुपारी जि.प.वर मोर्चा काढण्यात आला.
Next
ज गाव- ग्रा.पं.कर्मचार्यांना शासन निर्देशानुसार वेतन मिळावे, राहणीमान भत्ता लागू करावा, वेतन थकीत असलेल्या कर्मचार्यांना तातडीने वेतन द्यावे, भविष्य निर्वाह निधी न भरणार्या ग्रा.पं.वर कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी ग्रा.पं.कर्मचारी महासंघाच्या (आयटक) नेतृत्वामध्ये सोमवारी दुपारी जि.प.वर मोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी आयटकच्या पदाधिकार्यांसह मोर्चेकर्यांची भाकपाच्या बळीराम पेठेतील कार्यालयात बैठक झाली. त्यात जेएनयुमध्ये देशविरोधी घोषणांच्या आरोपांखाली अटक केलेल्या कन्हैया कुमारला मुक्त करावे, तो देशद्रोही नाही, त्याने मोदी सरकारचा धर्मनिरपेक्षताविरोधी अजेंडा हाणण्याचा प्रयत्न केला, चुकीच्या धोरणांवर बोट ठेवले, आरएसएसवाद समोर आणला म्हणून त्याला अटक केली. त्याला मुक्त करावे, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. आयटकचे अमृतराव महाजन, वासुदेव वारके, आबा पाटील, राजू कोळी, शिवशंकर महाजन यांच्यासह ग्रा.पं.चे कर्मचारी उपस्थित होते. यानंतर जि.प.वर मोर्चा काढण्यात आला. ग्रा.पं.कर्मचार्यांना न्याय मिळेल का..., ग्रा.पं. कर्मचार्यांना वेठीस धरणार्या ग्रा.पं.चा निषेध आदी घोषणा देण्यात आल्या. सीईओ, ग्रा.पं. विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. त्यात विविध मागण्या करण्यात आल्या. मागण्या अशा- शासनाने ग्रा.पं.कर्मचार्यांना किमान वेतन ५१०० ते ७१०० रुपये व विशेष भत्ता लागू केला. १४५० रुपये विशेष भत्ता वाढविला. पण ग्रा.पं.अदा करीत नाहीत. फरक दिला जावा. ग्रा.पं.च्या सफाई कर्मचार्यांना किमान वेतनापासून वंचित ठेवले आहे. त्यांना राहणीमान भत्ताही लागू केला नाही. तो तातडीने लागू केला जावा. कोळन्हावी, शिरागड आदी ग्रा.पं.च्या कर्मचार्यांना ३०-३० महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. या प्रकाराची दखल घेतली जावी. एक हजार पेक्षा अधिक ग्रा.पं.कर्मचार्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडलेले नाही. ही खाती उघडली जावीत. सेवा ज्येष्ठता यादी जाहीर करावी, ग्रा.पं.कर्मचार्यांचे अनुदान त्यांच्या नावाने जमा केले जावे, सेवा पुस्तिकांमधील नोंदी तातडीने कराव्यात, ग्रा.पं. कर्मचार्यांचे गणवेश, बोनस, हातमोजे, गमबूट, साबण व इतर साहित्य मागील फरकासह द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या.