ेसाकोरा येथे ग्रामसभा संपन्न

By admin | Published: December 8, 2015 12:03 AM2015-12-08T00:03:14+5:302015-12-08T00:03:33+5:30

साकोरा : येथे दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त होणारी ग्रामसभा रद्द करण्यात आल्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर नवनिनार्चित सदस्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पहिल्याच ग्रामसभेत विविध नवीन ठराव मंजूर करण्यात आले आहे. साकोरा येथे सरपंच वैशाली झोडगे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या ग्रामभेला उपसरपंच अतूल पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Gram Sabha concluded at Esacora | ेसाकोरा येथे ग्रामसभा संपन्न

ेसाकोरा येथे ग्रामसभा संपन्न

Next

साकोरा : येथे दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त होणारी ग्रामसभा रद्द करण्यात आल्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर नवनिनार्चित सदस्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पहिल्याच ग्रामसभेत विविध नवीन ठराव मंजूर करण्यात आले आहे. साकोरा येथे सरपंच वैशाली झोडगे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या ग्रामभेला उपसरपंच अतूल पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
सुरुवातीला ग्रामसेवक एच. पी. दराडे यांनी अहवाल वाचून दाखलल्यानंतर मागील प्रोसिडिंग मंजूर करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासन २०१५ च्या राजपत्रानुसार कर व फी (सुधारणा) आकारणी करण्याबाबतच्या प्रस्तावाचे वाचन झाल्यानंतर ग्रामस्थांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध करत जून्याच पद्धतीने कर आकारणी करण्याची मागणी केली. ग्रामस्थांकडून गावात दारू बंदीसह विविध मागण्यांबाबत पाठपुरावा करण्यासंबधी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यात येथील जाणता राजा मित्र मंडळाने केलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसाठी जागेची मागणी सर्वानुमते मजूर करण्यात आली असून यासंबधीच्या ठरावालाही ग्रामसभेने मजूरी दिली आहे.
दरम्यान, एका माजी सदस्याने ग्रामपंचयतीच्या कर थकबाकीचा मुद्दा उपस्थित करत गावचा विकास खुंटल्याचे सांगितले. त्यावर करवसूली साठी विषेश मोहीम राबविण्यात येणार असून पोलीस बंदोबस्तात नळपुरवठा खंडीत करण्याबाबत ठरावही मंजूर करण्यात आला. ग्रामस्थांनी नवनिवार्चित सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी रखडलेल्या योजना पूर्ण करण्याची मागणी करत गावातील सर्व मंदिरांच्या आवार स्वच्छतेविषयी उपाय योजना करावी,नवीन रस्ते व वीजेची व्यवस्था करावी, गावात नवीन शौचायांची बांधणी, व्यायामशाळा, बंधार्‍यातील साफसफाई,स्मशानभूमीचा रस्ता यासह ग्रामपंचायतीशी निगडीच विविध विकास कामांवर यावेळी चर्चा झाली (वार्ताहर)

Web Title: Gram Sabha concluded at Esacora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.