समता-सदभावनेच्या शपथेने ग्राम उदय अभियानाचा प्रारंभ

By admin | Published: April 15, 2016 01:55 AM2016-04-15T01:55:08+5:302016-04-15T23:48:26+5:30

बेळगाव ढगा, विल्होळी, गौळाणेसह दहा गावांचा समावेश

Gram Uday Abhiyan commenced with the oath of equality | समता-सदभावनेच्या शपथेने ग्राम उदय अभियानाचा प्रारंभ

समता-सदभावनेच्या शपथेने ग्राम उदय अभियानाचा प्रारंभ

Next

बेळगाव ढगा, विल्होळी, गौळाणेसह दहा गावांचा समावेश
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ग्राम उदय से भारत अभियानाचा शुभारंभ नाशिक तालुक्यातील दहा गावांमध्ये अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या हस्ते समता व सद्भावनेची शपथ देऊन करण्यात आला. बेळगाव ढगा येथे या समता व सद्भावना शपथेचे आयोजन करण्यात आले होते.
गोवर्धन गटातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणेअंतर्गत कामांचे भूमिपूजन व ग्राम उदय से भारत उदय अभियानाचा शुभारंभ या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी बेळगाव ढगा हे गाव दत्तक घेतले असून, गावातील ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक शाळा, स्मशानभूमी, पशुसंवर्धन दवाखाना आदि विविध विकासकामे सुरू आहेत. काही पूर्ण झाली आहेत. काही कामांचा शुभारंभ करण्यात आला. बेळगाव ढगा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ जयंतीचे औचित्य साधून ग्राम उदय से भारत उदय अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अध्यक्ष विजयश्री चुंबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मनोेगत व्यक्त केले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी, रत्नाकर चुंबळे, तुकाराम खांडबहाले, वामन चुंबळे, बाजीराव चुंबळे, उपअभियंता संजय पवार, शाखा अभियंता मधुकर लांबे, सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर गोवर्धन गटातील गौळाणे, आंबेबाहुला, विल्होळी, पिंपळद, जातेगाव, तळेगाव, बेळगाव ढगा, महिरावणी, दुडगाव या गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी आयोजित अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
फोटो एनएसके इडीटवर टाकला आहे.

Web Title: Gram Uday Abhiyan commenced with the oath of equality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.