Grand Water Saving Challenge : केंद्र सरकारकडून मिळणार ५ लाख रुपयांचे बक्षीस; संधी गमावू नका, २५ जूनपूर्वी करा अर्ज!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 05:21 PM2021-05-29T17:21:23+5:302021-05-29T17:23:00+5:30
Grand Water Saving Challenge : केंद्र सरकारनं एका स्पर्धेचे आयोजन केलं असून जिंकणाऱ्या व्यक्तिला ५ लाख आणि उपविजेत्याला २.५ लाखांचं बक्षीस दिले जाणार आहे.
Grand Water Saving Challenge : केंद्र सरकारनं एका स्पर्धेचे आयोजन केलं असून जिंकणाऱ्या व्यक्तिला ५ लाख आणि उपविजेत्याला २.५ लाखांचं बक्षीस दिले जाणार आहे. केंद्र सरकारकडून ही योजना आखण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन ( SBM) आणि संयुक्त राष्ट्र SDG, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड यांच्या समर्थनाने इनव्हेस्ट इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि AGNIi यांच्या सहयोगानं 'ग्रँड वॉटर सेव्हिंग चॅलेंज' सुरू केले आहे आणि त्यात सर्वांना सहभाग घेता येणार आहे.
काय आहे ही स्पर्धा?
सार्वजनिक शौचालयात फ्लश सिस्टिममधून प्रचंड प्रमाणात पाणी वाया जाते. पाणी वाचवण्यासाठी कल्पक फ्लश सिस्टिम तयार करायची आहे. स्पर्धेचा मुख्य उद्देश सामाजिक परिणाम, पाणी वाचवणे आणि स्वच्छता हे आहेत. सध्याच्या काळात पाण्याची बचत करणए गरजेचे आहे. पण, त्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व विसरता कामा नये. मुख्य उद्देश ध्यानी ठेऊन कल्पकतेनं फ्लश सिस्टम तयार करायची आहे आणि त्यातून पाणी वाचवण्यासोबतच स्वच्छतेचे महत्त्व राखले गेले पाहिजे.
Run by Toilet Board Coalition, the Challenge aims to address the need for an efficient flush system in public toilets to ensure optimum usage of water while ensuring a clean and hygienic toilet. More @ https://t.co/GmeDQDRHpU
— Digital India (@_DigitalIndia) May 28, 2021
बक्षीस रक्कम
- प्रथम विजेता - ५ लाख
- उपविजेता - २.५ लाख
अर्ज कुठे कराल?
https://www.startupindia.gov.in/content/sih/en/ams-application/challenge.html?applicationId=6050cc03e4b03f92cbc8c95e वरील लिंकवर अर्ज करता येईल
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्याची एंट्री स्टार्टअप इंडिया हबवर जमा केली जाते. DPIIT द्वारे नोंदणीकृत स्टार्टअप आणि शैक्षणिक संस्था यामध्ये सहभागी होऊ शकतात. २५ जून ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.