पीएम आवास योजनेत आता अधिक मोठ्या घरांना मिळेल अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 05:44 AM2018-06-14T05:44:19+5:302018-06-14T05:44:19+5:30

पंतप्रधान आवास योजनेत व्याज अनुदान मिळण्यासाठी पात्र ठरणाऱ्या मध्यम उत्पन्न गटासाठीच्या (एमआयजी) घरांच्या आकारात केंद्र सरकारने ३३ टक्क्यांनी वाढ केली आहे.

 Grant to get bigger houses now in PM housing scheme | पीएम आवास योजनेत आता अधिक मोठ्या घरांना मिळेल अनुदान

पीएम आवास योजनेत आता अधिक मोठ्या घरांना मिळेल अनुदान

Next

नवी दिल्ली -  पंतप्रधान आवास योजनेत व्याज अनुदान मिळण्यासाठी पात्र ठरणाऱ्या मध्यम उत्पन्न गटासाठीच्या (एमआयजी) घरांच्या आकारात केंद्र सरकारने ३३ टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे परवडणाºया घरांच्या बांधणीस प्रोत्साहन मिळेल, अशी केंद्र सरकारला आशा आहे.
गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने निवेदनाद्वारे या निर्णयाचा तपशील जाहीर केला. अनुदानासाठी पात्र ठरणाºया घरांचा आकार वाढविल्याने आता ‘एमआयजी’ वर्गातील अधिक लोक या योजनेतील घरे खरेदी करू शकतील. त्यामुळे २०२१पर्यंत सर्वांना घर देण्याचे उद्दिष्ट गाठणे सोपे होईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
मध्यमवर्गाची आकांक्षा मोठी असते. त्यामुळे ते पहिलेच घर मोठे घेण्याचा प्रयत्न करतात. अशी घरे पंतप्रधान आवास योजनेच्या निकषाच्या बाहेरची असतात. या लोकांना या योजनेचा फायदा मिळू शकत नाही, असे सर्वेक्षणात दिसून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार घरबांधणी क्षेत्रास तेजी आल्यास सिमेंट, पोलाद, बांधकाम साहित्य व यंत्रसामुग्री यांच्या उद्योगासही चालना मिळते. परिणामी, कुशल व अकुशल रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. हा अनुषंगिक लाभही हा निर्णय घेताना विचारात घेण्यात आला आहे.
मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार पंतप्रधान आवास योजनेत मध्यमर्गीयांना व्याज अनुदान योजनेस गेल्या काही तिमाहींमध्ये मोठी गती मिळाली आहे. दोन्ही ‘एमआयजी’ वर्गांतील ३५ हजार २०४ लाभार्थींना यंदा ११ जूनपर्यंत व्याज अनुदानापोटी ७३.७ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांसाठीही अशीच योजना लागू आहे. यंदाच्या जूनपर्यंत त्या वर्गातील १,३३, २१३ लाभार्थींना दोन कोटी ८९ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले.

एमआयजी-१
वार्षिक उत्पन्न :
६ लाख ते १२ लाख रु.
घराचा आकार :
आधी कमाल १२० चौ. मी. आता कमाल १६० चौ. मी.
व्याज अनुदान : चार टक्के
अनुदानपात्र गृहकर्ज
मर्यादा : नऊ लाख रु.
मिळणारे व्याज
अनुदान : २,३५,० ६८ रु.

एमआयजी २
वार्षिक उत्पन्न: १२ लाख ते १८ लाख रु.
घराचा आकार : आधी कमाल १५० चौ. मी. आता कमाल १८० चौ. मी.
व्याज अनुदान : तीन टक्के
अनुदानपात्र गृहकर्ज मर्यादा : १२ लाख रु.
मिळणारे व्याज अनुदान : २,३०, १५६ रु.

या सुधारणेमुळे आता आणखी लोकांना अनुदान मिळेल व घर घेण्याºयांना चांगला दिलासा मिळेल.

Web Title:  Grant to get bigger houses now in PM housing scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.