Graphic - मोबाइलमुळे गेला २१३८ लोकांचा जीव, पाहणीतील निष्कर्ष

By पवन देशपांडे | Published: September 8, 2017 12:03 AM2017-09-08T00:03:56+5:302017-09-08T01:53:16+5:30

गेल्या वर्षभरात वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने देशभरात २१३८ लोकांना जीव गमवावा लागल्याचे निदर्शनास आले आहे.

Graphic - Drove 2138 lives of people, survey findings | Graphic - मोबाइलमुळे गेला २१३८ लोकांचा जीव, पाहणीतील निष्कर्ष

Graphic - मोबाइलमुळे गेला २१३८ लोकांचा जीव, पाहणीतील निष्कर्ष

नवी दिल्ली , दि. 7 -अपघात टाळण्यासाठी वाहन चालवताना मोबाइलचा वापर करू नका, या सूचना अनेक जण पाळत नाहीत, असे आढळून आले आहे. गेल्या वर्षभरात वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने देशभरात २१३८ लोकांना जीव गमवावा लागल्याचे निदर्शनास आले आहे. अशा अपघातांत केवळ वाहनचालकच नव्हे, तर रस्त्यांवरून चालणाºयांचाही मृत्यू झाला आहे.
याशिवाय चुकीच्या पद्धतीचे स्पीडब्रेकर्स, रस्त्यांवरील खड्डे व रस्त्यांची अर्धवट व दर्जाहीन बांधकामे यांमुळे होणाºया अपघातांमध्ये रोज २६ लोकांचा मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे.
केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने सर्व राज्यांकडून माहिती मागवून अपघातांसंबंधीचा एक अहवाल तयार केला आहे. त्यात मोबाइलचा वापर करताना झालेल्या अपघातांत उत्तर प्रदेशातील सर्वाधिक लोक मरण पावल्याचे आढळून आले. महाराष्ट्रातील १७२ जणांनीही मोबाइलवर बोलताना जीव गमावला.

 

Web Title: Graphic - Drove 2138 lives of people, survey findings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.