कमाईची मोठी संधी! Yes Bank निम्म्या दराने शेअर विकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 07:33 PM2020-07-13T19:33:00+5:302020-07-13T19:34:56+5:30

राणा कपूरने घोटाळे केल्यानंतर मार्चमध्ये खळबळ उडाली होती. Yes Bank वर निर्बंध लादण्यात आले होते. SBIने मार्चमध्ये येस बँकेत 49 टक्क्यांची हिस्सेदारी घेतली होती. तसेच एसबीआयच्या केंद्रीय मंडळाने एफपीओमध्ये 1760 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आहे.

Great opportunity to earn! Yes Bank to sell shares at half price | कमाईची मोठी संधी! Yes Bank निम्म्या दराने शेअर विकणार

कमाईची मोठी संधी! Yes Bank निम्म्या दराने शेअर विकणार

googlenewsNext

नवी दिल्ली : हजारो कोटींच्या घोटाळ्यामुळे आर्थिक संकटात असलेली खासगी क्षेत्रातील Yes Bank 15 हजार कोटींचे शेअर विकणार आहे. महत्वाचे म्हणजे हे शेअर निम्म्या किंमतीत विकले जाणार असून 15 जुलै ते 17 जुलै अशी ही ऑफर उपलब्ध असणार आहे. शेअरची आधारभूत किंमत 12 रुपये निश्चित करण्यात आली आहे.


राणा कपूरने घोटाळे केल्यानंतर मार्चमध्ये खळबळ उडाली होती. Yes Bank वर निर्बंध लादण्यात आले होते. यामुळे बँकेचे शेअर कमालीचे गडगडले होते. मात्र, नंतर केंद्रीय अर्थ मंत्रालय़ाने येस बँक पुनरुज्जीवन योजना 2020 घोषणा जाहीर करत बँकेच्या नव्या संचालक मंडळावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे दोन संचालक नियुक्त केले होते. यामुळे येस बँक पुन्हा उभा राहणार हे निश्चित झाले होते. 


आता या संकटामुळे येस बँकेने बाजारातून पैसा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे 15 जुलैला फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ) खुला केला जाणार असून यातून 15 हजार कोटी रुपये गोळा करण्यात येणार आहेत. एफपीओसाठी किमान दर 13 रुपये असणार आहे. यासारखीच 2 रुपयांच्या शेअरसाठी फ्लोअर प्राईज 6 पट आणि कॅप प्राईज 6.5 पट ठेवण्यात आली आहे. या योजनेत कमीतकमी 1000 शेअरची बोली लावायची आहे. तर हजाराच्या पटीत कितीही बोली लावता येणार आहे. बँकेच्या पात्र कर्मचाऱ्यांना 1 रुपया सूट देण्यात येणार आहे. 


बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, एफपीओतून येणारा पैसा हा बँकेच्या पुढील दोन वर्षांचा विकास करण्यासाठी पुरेसा असणार आहे. खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी संख्या आवाक्यात ठेवण्यात येणार आहे. SBIने मार्चमध्ये येस बँकेत 49 टक्क्यांची हिस्सेदारी घेतली होती. तसेच एसबीआयच्या केंद्रीय मंडळाने एफपीओमध्ये 1760 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आहे. 
बँक शुक्रवारी शेअर बंद भावापेक्षा निम्म्या किंमतीने विकणार आहे. बँकेने काही प्रकरणांमध्ये अडकलेल्या मालमत्तांची ओळख पटविली आहे. कार्पोरेट कर्जही 55 टक्क्यावरून 40 टक्क्यांवर आणण्यात येणार आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Rajasthan Political Crisis: गेहलोत बहुमतात, तरीही आमदार अज्ञातस्थळी? भाजपकडून फ्लोअर टेस्टची मागणी

OnePlus Nord चे फिचर्स लीक; स्वस्त फोनमध्ये 6 कॅमेऱ्यांचा सेटअप आणि बरेच काही

सॅमसंगची फ्रिजवर ऑफर! 38 हजारांचा स्मार्टफोन मोफत; 9 हजारांचा कॅशबॅकही

अमेरिकेकडून चीनविरोधात युद्धाची तयारी?; दुसऱ्या महायुद्धातील नौदलाच्या 'विध्वंसक' तळाची पुन्हा उभारणी

शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल

कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे

Web Title: Great opportunity to earn! Yes Bank to sell shares at half price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.