Corona Vaccine: मोठा दिलासा! लवकरच सुरु होऊ शकते मुलांचे लसीकरण; स्वदेशी झायडसने मागितली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 10:10 AM2021-07-01T10:10:13+5:302021-07-01T10:11:27+5:30

corona vaccine for 12 plus years children's: देशात कोरोनाचा वेग आता कमी होऊ लागला आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने लसीकरणालाही वेग मिळाला आहे. याच दरम्यान लहान मुलांसाठी लस आणण्यासाठी कंपन्या धडपडत आहेत.

Great relief! Vaccination of children may begin soon; Zydus cadila asked for permission | Corona Vaccine: मोठा दिलासा! लवकरच सुरु होऊ शकते मुलांचे लसीकरण; स्वदेशी झायडसने मागितली परवानगी

Corona Vaccine: मोठा दिलासा! लवकरच सुरु होऊ शकते मुलांचे लसीकरण; स्वदेशी झायडसने मागितली परवानगी

Next

एकीकडे सरकारी समितीने सीरम उत्पादन करत असलेल्या कोवोव्हॅक्स लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या लहान मुलांवरील चाचण्यांना परवानगी न देण्याची शिफारस केली आहे, तर दुसरीकडे झायडस कॅडिलाने (Zydus Cadila ) डीसीजीआयकडे आपत्कालीन लसीकरणाची परवानगी मागितली आहे. यामुळे सीरमला मोठा झटका बसलेला असतानाच आता १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण सुरु होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. (Zydus Cadila applies for Emergency Use Authorisation (EUA) seeking approval from the Drugs Controller General of India (DCGI) for the launch of their DNA vaccine for 12 years & above. The vaccine has completed the third phase of trial.)

देशात कोरोनाचा वेग आता कमी होऊ लागला आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने लसीकरणालाही वेग मिळाला आहे. याच दरम्यान लहान मुलांसाठी लस आणण्यासाठी कंपन्या धडपडत आहेत. यामुळे झायडस कॅडिलाने गुरुवारी भारतात डीएनए लसीच्या आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयकडे परवानगी मागितली आहे. डीसीजीआयने परवानगी दिल्यास भारतात १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे लहान मुलांसाठीचे बेड, व्हेंटिलेटर आदींची तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जर भारत सरकारने झायडसच्या लसीला परवानगी दिली तर कोरोना विरोधातल्या लढ्याला मोठे हत्यार मिळाले आहे. महत्वाचे म्हणजे झायडस कॅडिलाच्या या लसीची तिसरी चाचणीदेखील पूर्ण झाली आहे. जर परवानगी मिळाली तर जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टमध्ये 12-18 वयोगटाच्या मुलांना ही लस देण्यात येणार आहे. 

जर केंद्र सरकारने या लसीला परवानगी दिली तर भारताकडे दुसरी स्वदेशी लस असणार आहे. या आधी भारत बायोटेकच्या कोरोना लसीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच भारत बायोटेक लहान मुलांवरची चाचण्या करत आहे. 

Web Title: Great relief! Vaccination of children may begin soon; Zydus cadila asked for permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.