ग्रीन कॉरिडोरमुळे 19 मिनिटांत पोहोचलं ह्रदय

By admin | Published: March 10, 2017 10:15 AM2017-03-10T10:15:34+5:302017-03-10T10:19:34+5:30

बंगळुरु वाहतूक पोलिसांनी तयार केलेल्या ग्रीन कॉरिडोरमुळे ह्रदय घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेने फक्त 19 मिनिटांत 25 किमी अंतर पुर्ण करत रुग्णालय गाठले

The green heart reached the heart in 19 minutes | ग्रीन कॉरिडोरमुळे 19 मिनिटांत पोहोचलं ह्रदय

ग्रीन कॉरिडोरमुळे 19 मिनिटांत पोहोचलं ह्रदय

Next
>
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 10 - बंगळुरु वाहतूक पोलिसांनी तयार केलेल्या ग्रीन कॉरिडोरमुळे ह्रदय घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेने फक्त 19 मिनिटांत 25 किमी अंतर पुर्ण करत रुग्णालय गाठले. ग्रीन कॉरिडोरमुळे एका व्यक्तीला जीवनदान मिळालं असून ह्रदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली आहे. मदत करण्याची इच्छा असेल तर ती मृत्यूनंतरही करता येते हेच अवयवदान करणा-या या व्यवसायिकाने सिद्ध केलं आहे.
 
या व्यवसायिकाने आपल्या मृत्यूनंतरही पाच जणांना जीवनदान दिलं. 2 मार्च रोजी या व्यापा-याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. 8 मार्च रोजी त्यांना मणिपाल रुग्णालयात ब्रेन डेड घोषित करण्यात आलं होतं. 9 मार्च रोची दिड वाजण्याच्या आसपास सर्व औपचारिकता पुर्ण झाल्यानंतर मृतकाचं ह्रदय ग्रीन कॉरिडोरच्या मदतीने शहरातील नारायण हेल्थ सिटी येथे पाठवण्यात आलं. 
 
(ग्रीन कॉरिडोरने महिलेला जीवदान)
 
नारायण रुग्णालयात भर्ती असलेले 43 वर्षीय पेशंट ह्रदयविकाराच्या झटक्याने त्रस्त होते, ज्यांच्या शरिरात या ह्रदयाचं प्रत्यारोपण करण्यात आलं. वेळेत ह्रदय प्रत्यारोपण झाल्याने त्यांना जीनवदान मिळालं आहे. 
 
ह्रदय दान करणारा व्यापारी राजस्थानचा राहणारा होता, मात्र ते बंगळुरुत येऊन स्थायिक झाले होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुलं आहेत. 2 मार्च रोजी दुचाकीरुन जात असताना विल्सन गार्डन येथील अशोक पिलरजवळ त्यांचा अपघात झाला. त्यांना 3 मार्च रोजी बनरगट्टा येथील मणिपाल रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं. 
 
उपचार करणा-या डॉक्टरांनी 8 मार्च रोजी त्यांना ब्रेन डेड घोषित केलं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांची किडनी आणि डोळेही दान करण्यात आले. किडनी मिळालेल्या व्यक्तीने त्यांचे आभार मानले असून, 'ओळख नसतानाही माझ्या नव्या आयुष्यासाठी त्यांनी मला मदत केली, त्यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत', अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
 

Web Title: The green heart reached the heart in 19 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.