स्मार्ट शहराच्या नियोजनात शेतकर्यांचाही विचार व्हावा ग्रीहा परिषद समारोप : गिरीश महाजन यांची अपेक्षा
By admin | Published: December 5, 2015 11:51 PM2015-12-05T23:51:08+5:302015-12-05T23:51:08+5:30
जळगाव : वाढत्या नागरिकीकरणामुळे शेतीचे पाणी शहरांना द्यावे लागते. त्यामुळे शेती व शेतकरी दुर्लक्षित रहातो. त्यामुळे ग्रामीण भागातील शेती आणि शेतकर्यांची स्थिती सुधारली तरच शहरांचा विकास होईल. स्मार्ट शहरांच्या नियोजनात शेतकर्यांचाही विचार व्हावा अशी अपेक्षा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे आयोजित परिषदेत व्यक्त केली.
Next
ज गाव : वाढत्या नागरिकीकरणामुळे शेतीचे पाणी शहरांना द्यावे लागते. त्यामुळे शेती व शेतकरी दुर्लक्षित रहातो. त्यामुळे ग्रामीण भागातील शेती आणि शेतकर्यांची स्थिती सुधारली तरच शहरांचा विकास होईल. स्मार्ट शहरांच्या नियोजनात शेतकर्यांचाही विचार व्हावा अशी अपेक्षा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे आयोजित परिषदेत व्यक्त केली. सातव्या प्रादेशिक ग्रीहा परिषदेचा शनिवारी येथील जैन हिल्सवर समारोप झाला. व्यासपीठावर जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, मनपा आयुक्त संजय कापडणीस, आमदार किशोर पाटील, क्रेडाईचे अध्यक्ष अनीश शाह, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र नन्नवरे, पूर्वा केसकर आदी उपस्थित होते. महाजन पुढे म्हणाले प्रत्येकाने पाण्याचा जबाबदारीने वापर केला पाहीजे. शहरांमध्ये ३५ टक्के पाण्याची गळती होते. त्याही समस्येचा सामना आपल्याला करावयाचा आहे. शहरातील सांडपाण्यावर भविष्यात प्रक्रिया करणे गरजेचे आहे. वाढत्या वृक्षतोडीमुळे हवामान बदलाचे संकट आपल्यापुढे आहे. जैन इरिगेशचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी देशाच्या शाश्वत विकासासाठी शेती, शेतकरी आणि ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीय करण्याची गरज बोलून दाखविली. देशातील ६० टक्के लोक खेड्यात रहात असून शहरेसुद्धा त्यांच्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे शहरांसोबत खेड्यांच्या विकासावर लक्ष केंद्रीय करायला पाहीजे. जोपर्यंत मने आणि विचार स्मार्ट होणार नाहीत, तोपर्यंत स्मार्ट शहरे निर्माण होणार नाहीत असेही ते म्हणाले. विकासाची नांदीस्मार्ट शहरांसंदर्भातील परिषद म्हणजे शहरासाठी भविष्यातल्या विकासाची नांदी असून शहर विकासासाठी आपण पुढाकार घेऊ असे मनपा आयुक्त संजय कापडणीस म्हणाले. भरत अमळकर यांचेही भाषण झाले. प्राचार्या वर्षा चोरडिया यांनी सूत्रसंचालन तर पूर्वा केसकर यांनी आभार मानले. -----फोटो कॅप्शनग्रीहा परिषद समारोप सत्रात बोलताना गिरीश महाजन. सोबत व्यासपीठावर अनीश शाह, भरत अमळकर, संजय कापडणीस, अतुल जैन, आमदार किशोर पाटील, राजेंद्र नन्नवरे, पूर्वा केसकर. फोटो नंबर ०६सीटीआर ५६ व ५७