विविध ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
By admin | Published: November 18, 2015 12:57 AM2015-11-18T00:57:25+5:302015-11-18T00:57:25+5:30
सोलापूर:
Next
स लापूर: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहरात सामाजिक संघटनांच्या वतीने विविध उपक्रमांसह प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यंत्रमाग कामगार सेनापूर्व भागात कुचननगर येथे महाराष्ट्र कामगार सेनाप्रणीत विडी व यंत्रमाग कामगार सेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी जिल्हाध्यक्ष श्रीनिवास चिलवेरी यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या कार्याची आठवण ठेवून त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी यांनी केले. यावेळी पद्मा म्हंता, विठ्ठल कुर्हाडकर, दशरथ नंदाल, किशोर नादरगी, पप्पू शेख, अंबादास कैरमकोंडा, प्रशांत जक्का, गणेश म्हंता, श्रीनिवास बोगा, लक्ष्मीबाई ईप्पा, लक्ष्मीबाई चिलवेरी, लक्ष्मी बोल्लू, मीराबाई लच्छुवाले, मुमताज सय्यद, गौरी पल्ले, रिहाना शेख, पार्वतीबाई पंदिला, कमलाबाई गुंडेटी, अनुराधा साखरे, वीणा गणेश, अश्विनी चिकणी, अर्चना चिलका, हरी दुध्याल, नागार्जुन कुसूरकर, श्रीहरी साका, विशाल चिलवेरी, विक्रम कारमपुरी, गुरुनाथ कोळी, व्यंकटेश मिठ्ठा, साई गायकवाड, लक्ष्मीकांत कोडम आदी उपस्थित होते. सोलापूर शहर शिवसेनासोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने उत्तर कसबा चौपाड येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेब अमर रहे, एकच साहेब बाळासाहेब अशा घोषणा देऊन जिल्हा उपप्रमुख सदानंद येलुरे, सुनील शेळके, विजय पुकाळे, विद्यार्थी शहराध्यक्ष सचिन खुर्द, रिक्षा सेना उपाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी बाळासाहेबांना वंदन केले. याप्रसंगी सागर रेळेकर, संदीप उजळंबे, राजू घोडके, सतीश कदम, सतीश शेळके, महादेव घुले, अनिल इंगळे, माधव मुळे, अमित पवार, शुभम मदले, बजरंग धायगुडे, अजय म्हमाणे, दिनेश सुरवसे, अशोक लोहार, बसवराज शिवशरण, अनिल इंगळे, नाना कळसकर, सतीश बोरकर, माणिक कोळेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते. वल्लभभाई पटेल शिवजन्मोत्सव मंडळसोलापूर: येथील सरदार वल्लभभाई पटेल शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सचिन डोईजोडे, उपाध्यक्ष गणेश चव्हाण, खजिनदार नरेश चव्हाण, तानाजी डोईजोडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.