संत रविदास यांना अभिवादन
By admin | Published: February 22, 2016 11:56 PM2016-02-22T23:56:56+5:302016-02-22T23:56:56+5:30
जळगाव- विविध कार्यक्रमांद्वारे संत रविदास यांना शहरातील विविध संस्थांतर्फे अभिवादन करण्यात आले. संत रविदास यांची ६४० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
Next
ज गाव- विविध कार्यक्रमांद्वारे संत रविदास यांना शहरातील विविध संस्थांतर्फे अभिवादन करण्यात आले. संत रविदास यांची ६४० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. कोऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीवानखेडे गुरूजी बॅकवर्ड कोऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीतर्फे संत रविदास समाज मंदिरात कार्यक्रम झाला. चेअरमन रामलाल नेटके, भादु वानखेडे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. यशवंत ठोसरे, संजय वानखेडे, विश्वनाथ सावकारे, कैलास वाघ, दीपक नेटके, ज्ञानदेव काकडे, दिलीप इंगळे, अर्जुन भारूळे, आशीष तांदळे आदी उपस्थित होते. गुरू रविदास संस्थासंत शिरोमणी गुरू रविदास संस्थेेतर्फे एम.के.सोनवणे, किसन पवार यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केली. डॉ.राधेश्याम चौधरी, राजू पवार, उत्तम सोनवणे, प्रदीप सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी, जगदीश गाढे, उत्तम सपकाळे, खंडू पवार, मनोज सोनवणे, शैलेश पवार, गोकुळ जाधव, रमेश पवार, बाळू बोहरे, नंदू बोहरे, किरण जाधव, अनिल डोखळे, चिंधाबाई रिछवाल, अशोक जाधव, सुनील बासनवाल आदी उपस्थित होते. गणेश लोडते यांनी सूत्रसंचालन केले. चर्मकार महासंघचर्मकार महासंघातर्फे टॉवर चौकात प्रदेशाध्यक्ष भानुदास विसावे यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. पांडुरंग बाविस्कर, गलू ठोसरे यांनी विचार मांडले. भगवान बाविस्कर, जयश्री विसावे, सुनील विसावे, गणेश सुरवाडे, संजय बाविस्कर, मंगला सोनवणे, दीपक अहिरे, किरण बाविस्कर, देवीदास बाविस्कर, ताराबाई चव्हाण, मीरा मोरे, विजय सुरवाडे आदी उपस्थित होते. सेवा संस्थासंत रविदास सेवा संस्थेतर्फे भास्कर मार्केट भागात उपशिक्षणाधिकारी यशवंत ठोसरे, बी.डी.तायडे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. संजय वानखेडे यांनी संत रविदास यांच्या कार्याची माहिती दिली. काशीनाथ इंगळे, संजय बाविस्कर, वाय.एन.ठोसरे, केशव ठोसरे, आर.आर.सावकारे, पी.एल.बाविस्कर, धनू इंगळे, कैलास वाघ, एकनाथ डोळे, विश्वनाथ सावकारे, चेतन तायडे आदी उपस्थित होते. संजय वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. काशीनाथ इंगळे यांनी आभार मानले.