जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा पोलीस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला
By admin | Published: May 24, 2017 08:48 PM2017-05-24T20:48:40+5:302017-05-24T20:50:08+5:30
जम्मू-काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातील पोलीस कॅम्पवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या एक नागरिक जखमी झाल्याचे समजते.
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 24 - जम्मू-काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातील पोलीस कॅम्पवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या एक नागरिक जखमी झाल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, शोपियन जिल्ह्यातील इमाम साहिब येथील पोलीस कॅम्पला दहशतवाद्यांनी लक्ष केले होते. मात्र, कॅम्पच्या रस्त्यावर ग्रेनेड पडल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे येथील एका पोलीस अधिका-यांने सांगितले.
या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला असून त्याची ओळख पटली आहे. इस्फाक रशिद असे या नागरिकाचे नाव असून त्याला येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुसरीकडे, काश्मीरमधील शोपियाँ भागात आज दहशतवादी बँक लुटण्यासाठी आले होते. यावेळी येथील उपस्थित असलेल्यांना धाकात घेतल्यावर त्यांनी सुरक्षारक्षकांची शस्त्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षारक्षकांनीही प्रसंगाला धैर्याने सामोरे जात दहशतवाद्यांचा सामना केला. त्यांनी आपल्याकडील मिरचीपूड शस्त्रे खेचण्याचा प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांच्या डोळ्यात टाकली. अचानक झालेल्या प्रतिकारामुळे दहशतवादी गांगरले. त्यामुळे बँक लुटण्याचा त्यांचा प्रयत्नही अयशस्वी ठरला.
दरम्यान, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून बँक लुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत या महिन्याच्या सुरुवातीलाच कुलगाम जिल्ह्यातील कादर येरीपोरा परिसरात असलेल्या इलाकाई देहाती बॅंकेत दोन दहशतवाद्यांनी दरोडा टाकून 65, 000 रुपयांची रोकड लुटून पोबारा केला होता. तर कुलागाम येथील एका बॅंकेच्या एटीएम कॅशव्हॅनला दहशतवाद्यांनी लक्ष्य करत 50 लाखांच्या रोकड लुटली होती. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये 5 पोलिसांचा समावेश होता. तसेच, दोन गार्डचीही समावेश होता.
J&K: Terrorists hurl grenade on CRPF and SOG camp in Shopian. One civilian injured pic.twitter.com/M0i8SLvPGm
— ANI (@ANI_news) May 24, 2017