Jammu-Kashmir: श्रीनगरमधील हरी सिंह रोडवर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, 9 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 16:17 IST2021-08-10T16:13:49+5:302021-08-10T16:17:24+5:30
Terrorists grenade attack: दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांना निशाणा बनवलं होतं, पण यात सामान्य नागरिक जखमी झाले.

Jammu-Kashmir: श्रीनगरमधील हरी सिंह रोडवर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, 9 जण जखमी
श्रीनगर- जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्येदहशतवाद्यांकडून ग्रेनेडने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. मंगळवारी श्रीनगरमधील प्रसिद्ध लाल चौक परिसरात हा हल्ला झाला. या हल्ल्यात 9 सिविलीयन्स म्हणजेच सामान्य नागरिक जखमी झाले आहेत. सध्या सुरक्षा दलाकडून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या हरी सिंह हाय स्ट्रीट परिसरात दहशतवाद्यांनी सुरक्ष दलाच्या जवानांच्या दिशेने ग्रेनेड फेकला. परंतु, ग्रेनेडचा निशाणा चुकला आणि ग्रेनेड रस्त्याच्या किनाऱ्यावर जाऊन फुटाल. उघड्यावर ग्रेनेड फुटल्यानं रस्त्यावरुन जाणारे 9 जण जखमी झाले. यासर्वांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं.
हरी सिंह स्ट्रीट लाल चौक परिसरात आहे. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर सुरक्षा दलाची गाडी होती. त्यांना हा ग्रेनेड सुरक्षा दलाच्या गाडीत फेकायचा होता, पण गाडीला टक्कर लागून ग्रेनेड रस्त्यावर पडला. या हल्ल्यानंतर परिसराला छापनीचे स्वरुन आले आहे.