आसाममध्ये मॉलबाहेर ग्रेनेड स्फोट, 12 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 11:54 PM2019-05-15T23:54:10+5:302019-05-15T23:54:41+5:30
गुवाहाटीमधील ज्यू रोड येथील एका मॉलबाहेर ग्रेनेडचा स्फोट घडवून आणला.
आसाम : गुवाहाटीमधील ज्यू रोड येथील एका मॉलबाहेर ग्रेनेडचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संपर्ण परिसरात नाकाबंदी केली आहे.
गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉलसमोर रात्री 8 वाजताच्या सुमारास ग्रेनेडचा स्फोट झाला. या स्फोटात 12 जण जखमी झाले असून चौकशी सुरु असल्याचे दीपक कुमार यांनी म्हटले आहे. तसेच, ग्रेनेड स्फोटातील जखमींना गुवाहाटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे.
Assam: Number of injured persons in Guwahati grenade blast rises to 12, all injured are in stable condition. pic.twitter.com/vnuprCL3dA
— ANI (@ANI) May 15, 2019
दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी ULFA-I या बंदी घातलेल्या संघटनेने घेतली आहे. तसेच, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या स्पोटातील आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
Assam: Six people injured in explosion outside a mall on Zoo road in Guwahati, area cordoned off, police present at the spot; injured persons referred to Guwahati Medical College Hospital pic.twitter.com/PotXVWsVFh
— ANI (@ANI) May 15, 2019