"...त्या दु:खाची भरपाई कधीच होऊ शकणार नाही;" २६/११ च्या पार्श्वभूमीवर रतन टाटांनी शेअर केली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 08:09 PM2021-11-26T20:09:21+5:302021-11-26T20:09:45+5:30
26/11 terror attacks in Mumbai Ratan Tata : २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आता १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर रतन टाटा यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
26/11 terror attacks in Mumbai Ratan Tata : मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांना आता १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांनी एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी २००८ मध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. आपल्याला तोडण्यासाठी केलेल्या या हल्ल्याची आठवण आपण कायम ठेवली पाहिजे असं ते म्हणाले.
रतन टाटा यांनी ताजमहाल हॉटेलच्या फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे. "आपल्याला तोडण्यासाठी असलेली ती आठवण कायम मनात ठेवली पाहिजे. ती आठवण आपल्या ताकदीचा स्त्रोत बनली पाहिजे, कारण आपण त्यांचा सन्मान करतो ज्यांना आपण गमावलं आहे," असं रतन टाटा यांनी लिहिलं आहे.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी एकूण १० दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे मुंबईत प्रवेश केला होता. या दहशतवाद्यांनी ताजमहाल हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ओबेरॉय ट्रायडेंट, कामा हॉस्पीटल, लियोपोल्ड कॅफे आणि नरिमन हाऊससह अनेक ठिकाणी गोळीबार केला होता. दहशतवाद्यांनी ताजमहाल हॉटेलमध्ये अनेकांना ओलीस ठेवलं होतं.