ंमेस्को मातानगरात पाणीप्रश्न गंभीर नागरिक संतप्त: पाईप लाईनचा प्रस्ताव

By admin | Published: August 26, 2015 11:32 PM2015-08-26T23:32:42+5:302015-08-26T23:32:42+5:30

जळगाव : शहरातील मेस्को माता नगर परिसरातील नागरिकांनी पाणी प्रश्नावरून महापालिका अधिकार्‍यांना धारेवर धरले. याप्रश्नी आमदार सुरेश भोळे यांनी मध्यस्थी करत पाईप लाईन टाकून देण्याच्या सूचना केल्या.

The grievance of the grievous citizen of the water crisis in the village of Memento: The proposal of pipeline | ंमेस्को मातानगरात पाणीप्रश्न गंभीर नागरिक संतप्त: पाईप लाईनचा प्रस्ताव

ंमेस्को मातानगरात पाणीप्रश्न गंभीर नागरिक संतप्त: पाईप लाईनचा प्रस्ताव

Next
गाव : शहरातील मेस्को माता नगर परिसरातील नागरिकांनी पाणी प्रश्नावरून महापालिका अधिकार्‍यांना धारेवर धरले. याप्रश्नी आमदार सुरेश भोळे यांनी मध्यस्थी करत पाईप लाईन टाकून देण्याच्या सूचना केल्या.
मेस्कोमाता नगरातील ५० ते ६० रहिवाशांना पाणी प्रश्न भेडसावत आहे. याप्रश्नी वारंवार तक्रारी करूनही उपयोग होत नाही. या बरोबरच या परिसरात घंटागाडी येत नसून साफसफाईलाही माणसे येत नाहीत. त्यामुळे नागरिक संतप्त झाले होते. दोन दिवसांपूर्वी आमदार सुरेश भोळे यांना या नागरिकांनी निवेदन दिले होते. आज काही नागरिकांनी उपायुक्त प्रदीप जगताप यांची भेट घेतली. आमदार भोळे यांनीही जगताप यांच्याशी चर्चा केली.

इन्फो-
पाईप लाईन टाकणार
या भागातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून लवकरच नवीन पाईप लाईन टाकण्याचे आदेश आमदार भोळे यांनी मनपा अधिकार्‍यांना दिले. महापालिका पाणी पुरवठा विभागातील अधिकार्‍यांनीही तातडीने या भागाला भेट दिली.

Web Title: The grievance of the grievous citizen of the water crisis in the village of Memento: The proposal of pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.