तक्रार निवारण प्रणाली

By admin | Published: February 7, 2016 10:46 PM2016-02-07T22:46:10+5:302016-02-07T22:46:10+5:30

हॅलो १...

Grievance redressal system | तक्रार निवारण प्रणाली

तक्रार निवारण प्रणाली

Next
लो १...
जळगाव- जिल्हा परिषदेत आपले सरकार अंतर्गत ग्रामस्थांच्या तक्रारी निवारणासाठी यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. ग्रामविकास विभागातर्फे या प्रणालीचे संचलन केले जाईल, असे म्हटले होते. परंतु ही यंत्रणा अजूनही कार्यरत झालेली नाही. ती २६ जानेवारीपूर्वी कार्यरत होईल, असे सांगण्यात आले होते. त्याबाबतच्या प्रशिक्षणासाठी जि.प.तील कर्मचारी हे नाशिक येथे जाऊन आले. पण अजूनही प्रणाली कार्यरत झालेली नाही.

आनंद मेळावा
जळगाव- सार्वजनिक विद्यालय, आसोदा येथे स्काऊट गाइड अंतर्गत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन अनिल महाजन यांच्याहस्ते झाले. मेळाव्यात विविध स्टॉल होते. एस.के.राजपूत, अनिता पाटील, एल.जे.भुगवड्या, एस.एम.मोरे आदींनी सहकार्य केले.

अनुदान अपूर्ण
जळगाव- शहरात स्वच्छता कार्यक्रमांतर्गत लाभार्थींना शौचालय बांधकामासाठी पाच हजार रुपये अनुदान देण्याचे पालिकेने म्हटले आहे. परंतु पाच हजार अनुदानात बांधकाम पूर्ण होत नाही. गरीब नागरिक शौचालयांचे बांधकाम स्वखर्चाने करू शकत नाहीत. त्यांना किमान १५ हजार रुपये अनुदान द्यायला हवे. याबाबत महापालिका महासभेत निर्णय घ्यावा, असे नागरिकांनी म्हटले आहे.

योगशिक्षक प्रशिक्षण
जळगाव- पतंजली योग समितीतर्फे सह योगशिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५.३० वाजता शिबिर सुरू होते. नूतन वर्षा कॉलनी, मोहाडी रोड येथे शिबिर होईल. प्रशिक्षण मोफत असून, सर्वांसाठी खुले आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत हे शिबिर सुरू राहील.

एसटी बसबाबत मागणी
जळगाव- जळगाव आगारातून रात्री ८.१० वाजता सुटणारी जळगाव-नंदगाव एसटी बस व्हाया खेडी खुर्द मार्गे सुरू करावी, अशी मागणी प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. रात्री अनेक प्रवासी या बसने जातात. खेडी खुर्द येथील आठ ते १० प्रवासी असतात. पण बस गावात जात नसल्याने प्रवाशांना खाजगी बसने नाइलाजाने जावे लागते, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Grievance redressal system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.