गोऱ्या मुलाला येथे मिळतो मृत्युदंड
By admin | Published: April 3, 2017 05:14 AM2017-04-03T05:14:19+5:302017-04-03T05:14:19+5:30
जारवा जमातीचे वास्तव्य ज्या भागात आहे तिथे बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही.
नवी दिल्ली : आपले मूल गोरे असावे असे कुणाला नाही वाटत? मात्र, अशीही एक जमात आहे की, इथे गोरे म्हणून जन्माला येणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. केंद्रशासित प्रदेश अंदमानमध्ये जारवा जमातीत गोरे मूल जन्माला येताच त्याला मारून टाकले जाते. याचे कारण असे सांगितले जाते की, गोरे मूल दुसऱ्या जमातीचे वाटते. अंदमान पोलिसांसमोर सध्या असे आव्हान आहे की, या जमातीविरुद्ध कारवाई करावी की, त्यांची परंपरा कायम ठेवावी. सरकारी आकडेवारीनुसार या जमातीची लोकसंख्या ४०० च्या आसपास आहे. अंदमान बेटाच्या उत्तर भागात हे लोक राहतात. असे सांगितले जाते की, ही जमात ५५ हजार वर्षांपासून येथे राहते; पण १९९० मध्ये प्रथमच हे लोक जगाच्या संपर्कात आले. जारवा जमातीचे वास्तव्य ज्या भागात आहे तिथे बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही.