नवरीला एकटा बाईकवर घ्यायला आला नवरदेव; पोलीस म्हणाले, "किमान पाच जण तरी आणायचीस"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 09:56 PM2021-04-27T21:56:20+5:302021-04-27T21:56:58+5:30
Police Surprised : दुचाकीवर वराला एकटे पाहून कर्तव्यावर तैनात असलेले पोलिसही अस्वस्थ झाले.
बलरामपूर - कोविड -१९ संसर्गामुळे संपूर्ण छत्तीसगडमध्ये लॉकडाउन सुरू आहे. अशा परिस्थितीत विवाहसोहळ्यांमध्ये जाणाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये बलरामपूर जिल्ह्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये वर आपल्या दुचाकीवरून एकट्याने आपल्या वधूला घ्यायला आला आहे. वर हा झारखंडचा रहिवासी आहे. दुचाकीवर वराला एकटे पाहून कर्तव्यावर तैनात असलेले पोलिसही अस्वस्थ झाले.
किंबहुना बलरामपूर रामानुजगंज जिल्ह्यातील सणावल येथे वराचे लग्न होणार होते. सर्व काही निश्चित होते. परंतु लॉकडाऊनमुळे लग्नाच्या वरात काढणं शक्य नव्हते. अशा परिस्थितीत वराने ड्रेस घातला आणि हेल्मेट घालून वधूला दुचाकीवरून आणायला गेला. रामानुजगंजच्या सीमेवर पोलिस पथकाने वराला एकटे पाहिले तेव्हा पोलिस पथकही आश्चर्यचकित झाले.
वराला थांबण्यास सांगितले
यानंतर पोलिसांनी वराला थांबवून विचारले की, आपण लग्न करणार आहात. हिंदू प्रथेनुसार किमान ५ लोक असावेत पण वर येथे फक्त एकटाच होता. पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याचा लग्न करण्याचा आग्रह पाहून पोलीस त्याला म्हणाले किमान ५ जणांना बोलवा तरच आम्ही आमच्या उच्च अधिकाऱ्यांकडून जाण्याची परवानगी मिळवून देऊ. वराला पटले नाही आणि त्याला वाटले की ५ लोकांच्या चक्करमध्ये त्याचे लग्न मोडू नये. तो पोलिसांना नकार देऊन लग्नासाठी एकटाच निघून गेला.
व्हिडिओ व्हायरल झाला आहे
आता वराचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत पोलिस त्याला समजावताना दिसत आहेत. वर म्हणाला की, कोरोना विषाणूमुळे गावातले लोक वरातीत सामील होणार नाहीत, त्यांना जबरदस्तीने कसे आणता येईल. त्याचवेळी, उपस्थित काही लोकांनी त्याचा व्हिडिओ बनविला आहे.