बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाला कोरोना, रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच दोघांचेही कुटुंब क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 02:24 PM2020-04-13T14:24:09+5:302020-04-13T14:41:07+5:30
चंदिगड : पंजाबमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. येथे कर्फ्यूमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. कोरोनाचा परिणाम ...
चंदिगड : पंजाबमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. येथे कर्फ्यूमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. कोरोनाचा परिणाम लग्न समारंभांवरही होताना दिसत आहे. पंजाबमधील मोगा येथे कोरोनामुळे एक लग्न समारंभ रद्द करण्याची वेळ आली. कारण येथे बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाला कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले. त्याचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
गेल्या महिन्यातच झाला होता साखरपुडा -
संबंधित नवरदेव हा फरीदकोट तर नवरी मोगा येथील आहे. या दोघांचे लग्न आज (सोमवार) होणार होते. एक महिन्यापूर्वी या दोघांचा साखरपुडा झाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच मुलाला कोरोना झाल्याचे समजले. यामुळे हे लग्न रद्द करावे लागले. यानंतर आरोग्य विभागाने नवरदेव आणि नवरी यांच्या कुटुंबांना क्वारंटाईन केले आहे. नवरदेवाची प्रकृती स्थिर आहे.
रात्री उशिरा रुग्णवाहिकेमागे पोलिसांच्या गाड्या -
मोगा येथील परमानंद भागात रात्री उशिरा एका रुग्णवाहिकेमागे पोलिसांच्या अनेक गाड्या दिसून आल्याने परिसरात खळबळ उडाली. यानंतर, ज्या मुलीचे लग्न ठरले होते त्या मुलीच्या कुटुंबीयांना शोधण्यासाठी हा ताफा आल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी रात्रीच संर्व कुटुंबियांची तपासणी केली. यात कुटुंबाच्या कुठल्याही सदस्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली नाही. मात्र, त्यांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
यासंदर्भात, पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर एक नोटीसही लावली आहे. मुलीच्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या आणखी एका कुटुंबालाही होम क्वारंटाईन कण्यात आले आहे कारण हे कुटुंबही साखरपुड्यात सहभागी झाले होते.
39 पैकी 35 सॅम्पल निगेटिव्ह
येथील सिव्हिल रुग्णालयात आतापर्यंत 39 सॅम्पल तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 35 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. ते चारही जम मुंबईतील असून जमातशी संबंधित आहेत.