हृदयद्रावक! रिसेप्शनच्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू; 3 दिवसांपूर्वी झालेला प्रेमविवाह, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 09:43 AM2022-12-01T09:43:23+5:302022-12-01T09:51:57+5:30
तरुणाचं 27 नोव्हेंबर म्हणजे अवघ्या तीन दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. रिसेप्शनच्या दिवशीच तरुणाचा मृत्य़ू झाला आहे.
बिहारमध्ये एक हृदयदावक घटना घडली आहे. सारण जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री एका बाईकचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे अपघातात जीव गमावलेल्या तरुणाचं 27 नोव्हेंबर म्हणजे अवघ्या तीन दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. रिसेप्शनच्या दिवशीच तरुणाचा मृत्य़ू झाला आहे. रिसेप्शनचं सामान खरेदी करण्यासाठी बाईकवरून गेलेल्या तरुणाचा अपघात झाला. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोखरेरा बगही गावामध्ये मंगळवारी रात्री हा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या दोन बाईकची जोरदार धडक झाली. या अपघातात चार जण गंभीररित्या जखमी झाले. यावेळी घटनास्थळी असलेल्या लोकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. त्याचवेळी डॉक्टरांनी नवीन लग्न झालेल्या रोशन नावाच्या तरुणाला मृत घोषित केलं.
डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर तीन गंभीर जखमींना आणखी चांगल्या उपचारासाठी पीएमसीएमयेथे रेफर केलं. तसेच जखमींपैकी एक असलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बगही गावातील निवासी असलेल्या रोशनचं 27 नोव्हेंबरला लग्न झालं होतं. छत्तीसगडच्या रायपूरची रहिवासी असलेल्या पिंकीसोबत त्याची ओळख झाली. पुढे ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोन्ही कुटुंबाच्या आशीर्वादाने लग्नही केलं.
30 नोव्हेंबर रोजी पूजा आणि रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. रोशनसह सर्वजण कार्यक्रमाची जोरदार तयारी करत होते. घरामध्ये उत्साहाचं वातावरण होतं. मंगळवारी रोशन आपल्या आईसह बाईकवरून पुजा आणि रिसेप्शनचं काही सामान आणण्यासाठी गेला होता. त्याचवेळी भीषण अपघात झाला आणि रोशनने आपला जीव गमावला आहे. त्याची पत्नी पिंकी हिला या घटनेने मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"