व्यापाराच्या विकासासाठी जीएसटी उपयुक्त शर्मा: महाराष्ट्र चेंबर आयोजित चर्चासत्र उत्साहात
By admin | Published: October 1, 2016 10:45 PM2016-10-01T22:45:38+5:302016-10-01T23:04:27+5:30
नाशिक : पुढील वर्षी १ एप्रिलपासून जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कर अमलात येणार असून ही कर प्रणाली अत्यंत सुटसुटीत असल्याने व्यापार उद्योगाला पोषक ठरेल, असे मत केंद्रीय उत्पादन शुल्क व सेवा कर आयुक्त आर. पी. शर्मा यांनी व्यक्त केले.
नाशिक : पुढील वर्षी १ एप्रिलपासून जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कर अमलात येणार असून ही कर प्रणाली अत्यंत सुटसुटीत असल्याने व्यापार उद्योगाला पोषक ठरेल, असे मत केंद्रीय उत्पादन शुल्क व सेवा कर आयुक्त आर. पी. शर्मा यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर आणि टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या यांच्या वतीने आयोजित वस्तू व सेवा कर (जीएसटी) या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होेते. यावेळी व्यासपीठावर चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल चव्हाण, विक्रीकर सहआयुक्त एच. ए. बाकरे, चेंबरच्या कर समितीचे चेअरमन सतीश बुब उपस्थित होते.
जीएसटीचा कायदा मंजूर झाला आहे. परंतु त्याबाबतचे नियम जीएसटी कौन्सिल बनविणार आहे. दीड कोटी रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर राज्य सरकारचे नियंत्रण असेल, त्यापुढील व्यवहार केंद्र सरकारच्या अखत्यारित असतील. कराचे दर साधारणत: १८ ते २० टक्के असतील तसेच नोंदणी, रिटर्न या सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने त्यात सुसूत्रता असेल, असे सांगून शर्मा यांनी ज्या वस्तूंना व्हॅट खाली सूट आहे, त्या सवलती जीएसटीत कायम राहणार असल्याचेही ते म्हणाले. चेंबरचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांनी व्यापारी आणि उद्योजकांना करात सुलभता हवी असल्याचे सांगितले. व्हॅट लागू करताना ज्या पद्धतीने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने विक्री विभागाला बरोबर घेऊन नागरिकांना माहिती दिली. त्याच पद्धतीने जीएसटीबाबतही सहकार्य राहील, असे चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले. यावेळी सेंट्रल एक्साइजचे उपआयुक्त प्रथमेश रेधनाम, सहायक आयुक्त गिरीश वेदसरी व डॉ. पी. के. राऊत यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जीएसटीची माहिती दिली. यावेळी सतीश बुब यांनी स्वागत केले. प्रास्ताविक अनिल चव्हाण यांनी केले. आभार सतीश बुब यांनी मानले. यावेळी प्रदीप कोर्डे, यू. के. शर्मा, भावेश माणेक, राजेश मालपुरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
छायाचित्र आर फोटोवर ३० चेंबर नावाने सेव्ह आहे. ओळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे जीएसटीवर आयोजित चर्चासत्रात बोलताना केंद्रीय उत्पादन शुल्कचे आयुक्त आर. पी. शर्मा. समवेत व्यासपीठावर सतीश बुब, अनिलकुमार लोढा, संतोष मंडलेचा, एच. ए. बाकरे आदि.