जीएसटीची अंमलबजावणी १ जानेवारीपासून?

By admin | Published: May 27, 2015 11:42 PM2015-05-27T23:42:30+5:302015-05-27T23:42:30+5:30

देशाच्या कर प्रणालीचा कायाकल्प करू शकेल अशा गुडस् अ‍ॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स अर्थात जीएसटीची अंमलबजावणी १ जानेवारी २०१६ पासून करण्याचे संकेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले.

GST execution since January 1? | जीएसटीची अंमलबजावणी १ जानेवारीपासून?

जीएसटीची अंमलबजावणी १ जानेवारीपासून?

Next

अहमदाबाद : देशाच्या कर प्रणालीचा कायाकल्प करू शकेल अशा गुडस् अ‍ॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स अर्थात जीएसटीची अंमलबजावणी १ जानेवारी २०१६ पासून करण्याचे संकेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले. चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडतेवेळी १ एप्रिल २०१६ पासून जीएसटी प्रणालाची अंमलबजावणी करण्याची घोषणा त्यांनी केली होती. पंरतु, आता तीन महिने अगोदरच याच्या अंमलबजावणीचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत.
केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने येथे आयोजित कार्यक्रमात जेटली बोलत होते. ते म्हणाले की, या नव्या प्रणालीमुळे कराच्या रचनेत सुसूत्रता येणार असून आंतरराज्यीय कर व्यवहारांतदेखील अधिक सुलभता येईल. याची परिणती कर संकलन वाढण्याच्या रूपाने होणार आहे. दरम्यान, नुकत्याच संपलेल्या संसदेच्या अधिवेशनात जीएसटीचा मुद्दा मार्गी लागू शकला नाही. त्यामुळे आता जानेवारीपासून जीएसटीची अंमलबजावणी करायीच असेल तर सरकारला त्यापूर्वीच यावर मंजुरीची मोहोर उमटवून घ्यावी लागेल.
 

Web Title: GST execution since January 1?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.